अखेर बॉलीवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाचा साखरपुडा झाला. असं चाहत्यांनी बोलण्यास सुरुवात केली आहे. त्याला कारण म्हणजे तिनं सोशल मीडियावरुन शेयर केलेले फोटो. त्या फोटोमध्ये सोनाक्षीनं तिचे काही फोटो पोस्ट केले आहेत. त्यामध्ये तिच्या बोटांत अंगठी असल्याचे दिसून आले आहे. दुसऱ्या एका फोटोमध्ये तिच्या खांद्यावर कुणाचा हातही आहे. ते फोटो पाहिल्यावर तिच्या त्या फोटोंवर चाहत्यांनी वेगवेगळ्या कमेंटस देण्यास सुरुवात केली आहे. चाहत्यांनी तिला भन्नाट कमेंटस दिल्या आहे. सोनाक्षी तुझ्या भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. पण तुझा होणारा पती कोण आहे, त्याचे नाव काय, तो करतो काय याबद्दल आम्हाला सांग..अशा प्रकारचे प्रश्न चाहत्यांनी तिला विचारले आहेत. यापूर्वी देखील सोनाक्षीच्या लग्नाची जोरदार तयारी सुरु झाल्याची चर्चा रंगली होती.

अधिक वाचा  ब्राह्मण महासंघाने सांगितली पवारांसोबतच्या बैठकीचं आमंत्रण नाकारण्याची कारणं..

सोनाक्षीनं ते फोटो शेयर केल्यानंतर त्याला एक कॅप्शनही लिहिली आहे. त्यामध्ये ती म्हणते, आज माझ्यासाठी सर्वात मोठा दिवस आहे. आनंदाचा क्षण आहे. मी जे स्वप्न पाहिलं होतं ते खरं झालं आहे. आणि माझा आनंद मी तुम्हा सगळ्यांसमवेत साजरा करते आहे. याचाही मला जास्त आनंद आहे. सोनाक्षीच्या त्या फोटोंवर चाहत्यांचे हजारो लाईक्स आणि कमेंटस आल्या आहेत. यापूर्वी सोनाक्षी ही खान कुटूंबियांची सून होणार अशा बातम्या व्हायरल झाल्या होत्या. त्या बातम्यांची चर्चा रंगल्यावर सोनाक्षीनं त्यावर खुलासा केला होता. आपण अद्याप याविषयावर काहीही प्रतिक्रिया देणार नसल्याचे तिनं सांगितलं होतं. सलमानच्या घरी ती उपस्थित असतानाचे तिचे फोटोही व्हायरल झाले होते.

अधिक वाचा  मांजरी बुद्रुक रेल्वेगेटवर लवकरच भुयारी मार्ग ?

सोनाक्षी म्हणते, मला अजून प्रतिक्षा करायची नाही. मला विश्वास बसत नाही की आज मी माझ्या आयुष्यातील सर्वात आनंदाचा क्षण साजरा करत आहे. काहींनी ते फोटो पाहिल्यावर सोनाक्षी ही लवकरच लग्नाच्या बंधनात अडकणार असल्याचे सांगितले आहे. काहींनी तिनं तिचा साखरपुडा उरकल्याचा अंदाज वर्तवला आहे. केवळ नेटकऱ्यांनीच नाहीतर आता बॉलीवूडमधल्या वेगवेगळ्या सेलिब्रेटींनी देखील सोनाक्षीच्या त्या फोटोवर कमेंट करुन तिला शुभेच्छा दिल्या आहेत.