सिंहगड किल्ला पर्यावरण रक्षणासाठी आपण अत्याधुनिक विद्युत ई बस सेवा सुरू केली आहे . त्या बद्दल आपले मनसे अभिनंदन आपण सर्व खाजगी गाड्यांसाठी सिंहगड किल्ला रस्ता बंद केला आहे. फक्त बस व पायी हे दोनच पर्याय उपलब्ध आहेत. आपला छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास प्रत्येकाने पाहिला पाहिजे, ऐकला पाहीजे जोपासला ही पाहीजे त्या साठी आपण ना नफा ना तोटा ही सेवा उपलब्ध करुन देणे गरजेचे आहे. आता आपण जे दर ठरवले आहे एक बाजु ५० / – रु येऊन जाऊन १०० / -रु प्रत्येकी लहान मुलांना २५ / व ५० / -रू हा दर खुप सर्व सामान्य परिवाराला परवडण्या सारखे नाही.

अधिक वाचा  राज ठाकरेंची तोफ धडाडणार; पुण्यात अखेर रविवारी सभा निश्चित

छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहासातील सिंहगड किल्ला बघण्यासाठी येणार्या पर्यटक व शिवप्रेमी नागरीकांसाठी आपण त्वरीत कमी दर मधे बस सेवा उपलब्ध करुन द्यावी. शालेय विद्यार्थी यांना मोफत सेवा असावी बसचे वेळापत्रक पण जाहीर करावे. बस भरल्यानंतरच बस प्रवास घेऊन जाणार असेल तर अनेक नागरिकांना दुसरा पर्याय नसल्याने ताटकळत थांबावे लागते हा दर त्वरीत कमी करून देण्याची मागणी मनसेच्या वतीने करण्यात आली.

काल ८/०५/२०२२ रोजी अनेक ई बस चार्जिंग नसल्याने गडावरच बंद पडल्या अनेक जेष्ठ , विद्यार्थी , महिला सर्व नागरिकांचे खुप हाल झाले त्यांना पायी गडावरुन खाली यावे लागले आहे. अशा घटना परत न घडण्यासाठी दक्षता घ्यावी लागणार आहे . अनेक नागरिकांच्या तक्रारी आल्यानंतर आपणांस विनंती करत आहे लवकरच आपण मार्ग काढाल हिच अपेक्षा नाहीतर मनसे आपल्या विभागात लोकशाही मार्गाने आंदोलन करन्याचा इशारा देण्यात आला आहे. यावेळी श्री. प्रशांत कनोजिया, श्री कैलास दांगट , श्री चंद्रकांत गोगावले , श्री सचिन काटकर , श्री विजय मते, श्री सचिन पांगारे व खडकवासला मनसे पदाधिकारी ॲड.सचिन पवार , रूपेश घोलप , ॲड.अमेय बलकवडे , ॲड.सचिन ननावरे , सुर्यकांत कोडीतकर , निलेश जोरी , प्रशांत महानवर व सर्व मनविसे पदाधिकारी उपस्थित होते.