जागतिक सामाजिक कार्यातील क्रमवारीत सर्वौच्च नागरी पुरस्कार मानल्या जाणाऱ्या नेल्सन मंडेला नोबल पीस पुरस्कार २०२२ या पुरस्कारासाठी कर्वेनगर पुणे येथील नगरसेवक राजाभाऊ बराटे यांची निवड करण्यात आली. कोरोना काळ आपत्तीत अन्नधान्य औषधे तसेच अत्यावश्यक वैद्यकिय सेवा उपलब्ध करुन देण्याचे कार्य त्यांनी पार पाडले होते.

या कार्याची दखल म्हणुन नोबल पीस अवार्ड २०२२ करीता निवड करण्यात आली. गुरुवार दिनांक २८ एप्रिल रोजी मुंबई विलेपार्ले येथील सहारा स्टार येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे बंधू प्रल्हाद मोदी यांच्या हस्ते राजाभाऊ बराटे यांना सभारंभपुर्वक हा पुरस्कार देण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे दुबईचे राजा शेख राजा यांची उपस्थिती होती.

अधिक वाचा  OBC आरक्षणासाठी भाजपचे आंदोलन ,आंदोलकांना पोलिसांनी घेतले ताब्यात

या नागरी सत्कारवेळी राजाभाऊ बराटे यांचा सत्कार करताना विठ्ठल अण्णा बराटे व प्रभागाचे आरोग्य निरीक्षक श्री राजेश आहेर मुकादम अंकुश साठे, पत्रकार माऊली म्हेत्रे आणी सर्व मित्रपरिवार उपस्थित होते