खडकवासला विधानसभा मतदारसंघाचे आमदार भिमराव तापकीर यांनी चांदणी चौक उड्डाणपूलाच्या कामाची पहाणी केली. यावेळी चांदणी चौकाकडून भुसारी काॅलनी कडे येणारा रस्ता, शृंगेरी मठ, डावी भुसारी काॅलनी कडून वारजेला जोडणारा सर्व्हिस रस्ता १५ दिवसात नागरीकांसाठी खुला करावा अशा सूचना यावेळी संजय कदम (प्रकल्प संचालक) राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण यांना केल्या. वेदविहार व परिसरातील सोसायट्यांना वाहतुकीच्या समस्येला सामोरे जावे लागत असल्याचे तसेच याच रस्त्यावर खड्डा होऊन त्यात पाणी साठत असल्याचे तसेच महात्मा सोसायटीकडे हायवे वरून वळताना पुढे यूटर्न घ्यावा लागतो व त्यामुळे वाहनचालकांना पुढे जाऊन वळून यावे लागते,या सर्व समस्या अधिकार्यांच्या निदर्शनास आणून दिल्या.यावर तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना मा.कदम यांनी संबंधितांना दिल्या.
यावेळी नगरसेविका अल्पना वरपे, नगरसेवक दिलीप वेडेपाटील, नगरसेवक किरण दगडेपाटील, नगरसेविका डाॅ.श्रद्धा प्रभुणे, किरण बारटक्के, अॅड.गणेश वरपे, वैभव मुरकुटे, बाळासाहेब टेमकर, डाॅ.मनिषा जाधव, राजेश भेगडे, रूपेश भोसले, अमोल शिर्के, अशोक दुग्गर (प्रादेशिक अभियंता) कन्स्ट्रक्शन इंजिनिअरिंग ग्रुप (सल्लागार), चांदणीचौक उड्डाणपूल प्रकल्प), डी. श्रीनिवास राव (प्रोजेक्ट इंनचार्ज) नागार्जुना कन्स्ट्रक्शन कंपनी चांदणीचौक उड्डाणपूल प्रकल्प, किशोर भरेकर ( संपर्क अधिकारी) नागार्जुना कन्स्ट्रक्शन कंपनी चांदणीचौक उड्डाणपूल प्रकल्प उपस्थित होते.
आमदार भिमराव तापकीर यांनी यावेळी वेदभवन मंदिराबाबत मा.घैसास गुरूजी यांच्यासोबत देखील चर्चा केली व त्यांना सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आवाहन केले याबाबत त्यांनीही सकारात्मकता दर्शविली.