मुंबई : मुंबईतील लाऊडस्पीकरबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन न केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांत दोन गुन्हे दाखल झाले आहेत. सकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत कोणी स्पीकर वाजवत असेल, तर निश्चित केलेल्या डेसिबलच्या नियमांचे पालन करणं बंधनकारक आहे.

मात्र वांद्रे येथील नुरानी मशिदीच्या व्यवस्थापनावर नियमांचे पालन न केल्याचा आरोप आहे. त्यामुळे वांद्रे पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध भादंवि कलम 188 आणि महाराष्ट्र पोलिसांच्या कलम 37 (1), (3), 135 नुसार तक्रार दाखल केली आहे. कायदा आणि ध्वनी बंदी नियमांचे कलम 33 (R)(3) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक वाचा  अनुप डांगेंचा आणखी एक लेटर बॉम्ब

तसेच एएनआय या वृत्तसंस्थेनुसार, राज्याच्या गृह विभागाने मुंबईत एकूण 1140 मशिदी असल्याचे सांगितले आहे. त्यापैकी 135 जणांनी आज सकाळी 6 वाजण्यापूर्वी लाऊडस्पीकरचा वापर केला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाच्या विरोधात गेलेल्या 135 मशिदींवर योग्य ती कारवाई करण्यात येणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने जुलै 2005 मध्ये सार्वजनिक ठिकाणी रात्री 10 ते सकाळी 6 या वेळेत लाऊडस्पीकर वापरण्यास बंदी घातली होती.