मुंबई : महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांचे फोन टॅपिंग करुन त्यांना अडचणीत आणल्याप्रकरणी आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला याची चौकशी सध्या सुरु आहे. याप्रकरणात आज काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा जबाब नोंदविण्यात येणार आहे.

शुक्ला यांनी शिवसेनेचे नेते, खासदार संजय राऊत, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, राज्यमंत्री बच्चू कडू, आशिष देशमुख आणि संजय काकडे यांचे फोन टॅप केले होते. नाना पटोले यांच्या नावासमोर अमजद खान असे लिहून त्यांचे फोन टॅप केले होते.

याप्रकरणी पुणे पोलिस आज नाना पटोले यांचा जबाब नोंदविणार आहेत. शुक्लांवर बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पुण्याच्या पोलीस आयुक्तपदी असताना त्यांनी हे फोन टॅपिंग केले होते. बेकायदा फोन टॅपिंग केल्याचा पोलीस अधिकारी रश्मी शुक्लांवर आरोप आहे.

अधिक वाचा  बारामतीचा गडी एवढा हुशार कसा? कोणते स्पेअर पार्ट घातले होते, मी मेल्यावर ब्रह्मदेवाला विचारणार..

अमजद खान या नावानं नाना पटोलेंचा फोन टॅप केल्याची माहिती आहे. यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांचेही फोन खोट्या नावांनी टॅप केल्याचं उघड झालं होतं.

पुणे पोलीस आज मुंबईत येऊन रश्मी शुक्ला फोन टॅपिंग प्रकरणी पटोले यांचा जबाब नोंदवणार आहेत. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि त्यांच्या सहकार्यांचा फोन टॅप करण्यात आला होता. अमजद खान नावानं नाना पटोले यांचा फोन टॅप करण्यात आला होता.

अमजद खान हा अंमली पदार्थांची तस्करी करणारी टोळी चालवत असून त्याचा पर्दाफाश करण्यासाठी गृह विभागाकडे त्यांनी मागितली होती. त्यावेळील नाव अमजद खान असलं तरी मोबाईन नंबर मात्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा देण्यात आला होता. आज दुपारी पटोले यांचा जबाब पुणे पोलीस मुंबईत नोंदवणार आहेत.