अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) झारखंडच्या खूंटी जिल्ह्यात मनरेगा निधीतील 18 कोटी रुपयांहून अधिक रकमेच्या कथित अपहाराप्रकरणी झारखंडच्या खाण सचिव पूजा सिंघल आणि तिच्या कुटुंबीयांच्या जागेवर छापे टाकले होते. एजन्सीला रांचीमधील दोन ठिकाणी छापे मारताना एकूण 19.31 कोटी रुपयांची रोख रक्कम सापडली आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आयएएस अधिकारी पूजा सिंघल यांच्याशी संबंधित तीन प्रकरणे आहेत. बेहिशोबी मालमत्ता, अवैध खाणकाम आणि मनरेगा घोटाळा. ईडीने शुक्रवारी पूजा सिंघलशी संबंधित 18 हून अधिक ठिकाणी छापे टाकले. सर्वाधिक छापे झारखंडमध्ये झाले आहेत. ईडीने 19 कोटींची रोकड जप्त केली आहे. तर पूजा सिंघलच्या सीएकडून 17 कोटींची रोकड मिळाली आहे.

अधिक वाचा  पुणे आणि नागपूर घटनेचे 'कनेक्‍शन'? एक सारखीच घटना घडल्याने वाढले गूढ

पूजा सिंघलच्या विरोधात तक्रार मिळाल्यानंतर ईडीने छापा टाकला आहे. फेब्रुवारी 2022 मध्ये झारखंड उच्च न्यायालयाचे वकील राजीव यांनी पूजा सिंघलच्या विरोधात ईडीकडे तक्रार दाखल केली. ईडीकडे पूजा सिंघल यांच्याविरुद्ध बेकायदेशीर खाणकामातून मनी लाँड्रिंगची तक्रार प्राप्त झाली होती.

पूजा सिंघल या तिच्या मर्जीतील ठेकेदारांना वाळू उत्खननाचे कंत्राट देत असल्याचा आरोप आहे. भाव खान यांनी मुख्यमंत्री हेमंत सोरेन आणि त्यांचे बंधू आणि आमदार बसंत सोरेन यांना पैशाचे वाटप केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. याप्रकरणी हेमंत आणि त्याच्या भावाला निवडणूक आयोगाने नोटीस बजावली असून त्यांना उत्तर देण्यास सांगण्यात आले आहे. हेमंतवर खाण लीजवर कार्यालयाचा गैरफायदा घेतल्याचा आरोप आहे.

अधिक वाचा  राज ठाकरेंना पुण्यातील सभेआधी शिवसेने कडून मोठा धक्का!

दुसरीकडे, पूजा सिंघल यांच्यावर खुंटी आणि चतरा येथील मनरेगामध्ये घोटाळा केल्याचा आरोपही आहे. याचीही ईडी चौकशी करत आहे. पूजा सिंघल या खाण आणि उद्योग विभागाच्या सचिव आहेत. त्या झारखंडच्या शक्तिशाली आयएएस अधिकारी आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ईडीने या प्रकरणी अद्याप कोणालाही अटक केलेली नाही. शुक्रवारी 18 ठिकाणी छापे टाकण्यात आले. समोर आलेल्या बातम्यांनुसार ईडीची टीम अजूनही सीए रोशनच्या रांची येथील निवासस्थानी हजर आहे. ईडीला पूजा सिंघल आणि तिच्या सीएच्या सरकारी निवासस्थानावरून छापेमारीदरम्यान काही महत्त्वाची कागदपत्रेही सापडली आहेत.

सिंघल या 2000 च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत आणि यापूर्वी ते खुंटी जिल्ह्यात उपायुक्त म्हणून कार्यरत होते. एजन्सीच्या अधिकाऱ्यांकडून रांची येथील रुग्णालयासह इतर काही ठिकाणी छापे टाकण्यात येत आहेत. केंद्रीय राखीव पोलीस दलाचे जवान त्यांना सुरक्षा देत आहेत.