पुणे : पक्षात महत्त्वाच्या पदावर तरुणांना संधी द्या; पक्षात तरुण कार्यकर्ते दिसले पाहिजेत. पक्षाचा विचार तरुण हवा, कृती तरुण हवी, दिसणे आणि जिंकणेही तरुणांसारखेच असले पाहिजे, असे मत माजी केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांनी शुक्रवारी व्यक्‍त केले.

पी. चिदंबरम म्हणाले की, ‘‘मी स्वत:ला भाग्यशाली समजतो की मी या ऐतिहासिक काँग्रेस भवनला भेट दिली. आज काँग्रेस पक्षाची सत्ता काही मोजक्या राज्यांमध्येच आहे. महाराष्ट्रामध्ये आपण सत्तेत आहोत. नुकतेच पक्ष संघटनेच्या निवडणुकीसाठी डिजिटल सभासद नोंदणीची प्रक्रिया पार पडली आहे. लवकरच बुथ, ब्लॉक व शहर कार्यकारिणीचे निवडणुका होतील. त्यानंतर प्रदेश कार्यकारिणी आणि नंतर अखिल भारतीय काँग्रेस कमिटीची निवडणूक होईल.

अधिक वाचा  पेट्रोल-डिझेलवरील व्हॅट कपात म्हणजे 'उंटाच्या तोंडात जिरे'; फडणवीसांची टीका

लाहोर काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये काँग्रेस पक्षाने पूर्ण स्वराज्याची मागणी केली आणि तसा ठराव करण्यात आला. पं. जवाहरलाल नेहरू अगदी लहान वयात अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष झाले. आज ६०% मतदार युवक आहेत. पक्षातील युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पक्ष संघटना बळकट करण्याचे काम हाती घ्यावे. आज काँग्रेस पक्षाला हाडाच्या कार्यकर्त्याची गरज आहे. कार्यकर्त्यांमुळे आपण निवडणुक जिंकतो आणि सत्तेत येतो. आजच्या पिढीला महात्मा गांधी, पं. जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी व राजीव गांधी यांनी देशासाठी दिलेल्या योगदानाबद्दल माहिती नाही. केंद्रातील सरकार इतिहासातून या थोर नेत्यांनी केलेले कार्य संपविण्याचे काम करीत आहे. त्यामुळे प्रत्येक काँग्रेस कार्यकर्त्याने आजच्या युवा पिढीला काँग्रेसच्या थोर नेत्यांनी केलेल्या कार्याची माहिती दिली पाहिजे.’’

अधिक वाचा  राहुल गांधी पुन्हा पक्षातील नेते साथ सोडताना परदेश दौऱ्यावर

यावेळी माजी आमदार उल्हास पवार, मोहन जोशी, अनंत गाडगीळ, ॲड. अभय छाजेड, रमेश अय्यर, चंद्रशेखर कपोते, लता राजगुरू, सुजाता शेट्टी, वैशाली मराठे, पुजा आनंद, शानी नौशाद, राजेंद्र शिरसाट, बाळासाहेब अमराळे, नुरूद्दीन सोमजी, रजनी त्रिभुवन, शिलार रतनगिरी, सुजित यादव, सचिन आडेकर, ॲड. अनिल कांकरिया, ॲड. निलेश बोराटे, आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.