देशात गेल्या काही महिन्यांपासून इलेक्ट्रीक स्कूटरनी दहशत पसरविली आहे. ओला, ओकिनावापासून ते प्युअर इलेक्ट्रीक स्कूटरपर्यंत स्कूटर कधी चार्जिंग करताना, कधी पार्किंगमध्ये तर कधी रस्त्यावर पेटली आहे.यावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी कंपन्यांना हलक्यात न घेण्याचे आदेश दिले, याचबरोबर केंद सरकारने याचा तपास करण्यासाठी समिती स्थापन केली होती. या समितीचा अहवाल आला आहे.

केंद्र सरकार ईलेक्ट्रीक स्कूटरचा खप वाढविण्यासाठी बॅटरींवर सबसिडी देते. म्हणजे जवळपास या बॅटरी फुकटच मिळतात. याच बॅटऱ्या सदोष असल्याने स्कूटरना आगी लागल्याचे कारण समोर आले आहे. केंद्र सरकार या वाहनांच्या उत्पादकांवर बॅटरीचा दर्जा सुधारण्यासाठी दबाव आणू शकते. चौकशी समितीला देशातील जवळपास सर्वच इलेक्ट्रिक दुचाकी आगीच्या घटनांमध्ये बॅटरी सेल किंवा डिझाइनमध्ये दोष आढळला आहे. यामध्ये ओकिनावा, बूम, प्युअर, जितेंद्र आणि ओला इलेक्ट्रिक सारख्या कंपन्यांचा समावेश आहे.

अधिक वाचा  संभाजीराजेंचा राज्यसभेचा मार्ग खडतर?; मतांची गणितं? वाचा सविस्तर

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ई-वाहन क्षेत्रातील तज्ज्ञ आता त्यांच्या वाहनांशी संबंधित बॅटरी समस्या सोडवण्यासाठी ईव्ही उत्पादकांशी संपर्क साधतील आणि उपाय सुचवतील. तेलंगणातील निजामाबाद जिल्ह्यात एका ई-स्कूटरचा स्फोट होऊन एका 80 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आणि दोन जण जखमी झाले होते. आंध्र प्रदेशातील विजयवाडा येथे एका तरुणाचा मृत्यू झाला होता. आतापर्यंत जवळपास 25 ई-स्कूटर्सना आग लागण्याच्या किंवा स्फोटाच्या घटना घडल्या आहेत. यावर केंद्राने कंपन्यांना त्यांच्या इलेक्ट्रीक गाड्यांचे लाँचिंग थांबविण्याचे आदेश दिले आहेत.