मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे  यांचे पुत्र अमित ठाकरे आणि सून मिताली ठाकरे यांना काही दिवसांपूर्वी पुत्ररत्न प्राप्त झाले. राज ठाकरे आजोबा झाल्यानंतर त्यांच्या नातवाचं नाव काय असणार, याबाबत मोठी चर्चा सुरू होती. आज अखेर नामकरण सोहळा पार पडला आहे.

राज ठाकरे यांचा नातू आणि अमित ठाकरे यांच्या पुत्राचं नाव ‘किआन’ असं ठेवण्यात आलं आहे. ‘किआन’ हे हिंदू धर्मातील नाव आहे. या नावाचा अर्थ देवाची कृपा, प्राचीन, राजेशाही असा आहे. याची रास मिथून असून नक्षत्र मृग आहे.

२७ जानेवारी २०१९ रोजी अमित ठाकरे आणि मिताली बोरूडे यांचा विवाह झाला होता. लोअर परळमधील सेंट रेजिस या हॉटेलमध्ये त्यांचा विवाहसोहळा पार पडला. मिताली बोरूडे या फॅशन डिझायनर आहेत. त्यांनी फॅड इंटरनॅशनलमधून फॅशन डिझायनिंगचं शिक्षण पूर्ण केलंय. त्यांचे वडिलही प्रसिद्ध सर्जन आहेत.

अधिक वाचा  हनुमानाचं खरं नाव काय? प्रश्न विचारताच नवनीत राणांची पंचाईत..