मुंबई : शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांना कोरेगाव भिमा येथील दंगल प्रकरणात क्लीनचीट देण्यात आली आहे. त्यानंतर यावर राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी प्रतिक्रिया देत मोठे विधान केलं आहे. ते म्हणाले की, संभाजी भिडे यांना क्लीनचीट मिळाली असं म्हणायचे कारण नाही.

ज्यावेळी गुन्हा दाखल झाला त्यावेळी एफआयआरमध्ये नाव होतं. मात्र, आता पुरावे न मिळाल्याने त्यांचे नाव चार्जशीटमधून काढण्यात आले असावे. मात्र, तरीही आम्ही तपासून घेऊ, असे विधान वळसे पाटील यांनी केले आहे. ते मुंबईत माध्यामांशी बोलत होते.

अधिक वाचा  मलायका अरोरा पुन्हा लग्नबंधनात; अर्जुन कपूरशी थाटणार संसार, तारीखही ठरली!