मशिदींवरील अनधिकृत भोंगे काढण्याबाबत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेयांनी आक्रमक भूमिका घेतली. त्यामुळे 4 तारखेला ठिकठिकाणी मनसैनिकांनी मशिदींसमोर हनुमान चालीसा वाजवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे पोलिसांनी मनसेच्या कार्यकर्त्यांचे अटकसत्र सुरू केलं होतं. पण, मुंबई पोलीस ताब्यात घेण्यासाठी आले असता मनसेचे नेते संदीप देशपांडे  कारमधून पळून गेले होते. यावेळी कारचा धक्का लागल्यामुळे महिला पोलीस कर्मचारी जखमी झाली. या प्रकरणी संदीप देशपांडेवर दाखल करण्यात आला आहे. आता या प्रकरणी अपडेट समोर आली आहे. संदीप देशपांडे आणि संतोष धुरी पळून जाताना वापरण्यात आलेली इनोव्हा गाडी ज्या ड्रायव्हरने चालवली होती त्याला अटक करण्यात आली आहे.

अधिक वाचा  राजीव गांधी हत्या दोषी 'पेरारिवलन' ची होणार सुटका, सर्वोच्च न्यायालयाचा आदेश

शिवतीर्थ या निवासस्थानाबाहेर पोलिसांना चकवा देऊन मनसे नेते संदीप देशपांडे आणि संतोष धुरी पसार होत असताना झालेल्या गदारोळात महिला पोलीस जखमी झाली होती. याप्रकरणी संदीप देशपांडे यांच्याविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या पोलीस दोघांचा शोध घेत आहे. आता संदीप देशपांडे निसटून जात असताना त्यांची कार चालवणाऱ्या ड्रायव्हरला शिवाजी पार्क पोलिसांनी अटक केली आहे.