अभिनेता अजय देवगन काही दिवसांपासून हिंदी ही आपली राष्ट्रभाषा असल्याचं म्हणत काही कलाकारांच्या मतांवर व्यक्त होत त्यांना धारेवर धरताना दिसला. त्याच्या नावाच्या बऱ्याच चर्चा सुरु झाल्या. यामध्येच आता त्यानं पुन्हा नजरा वळवल्या आहेत.निमित्त ठरतंय ते म्हणजे शाहरुख खान याच्यासोबत असणारा त्याचा वाद आणि हाणामारी. 90 च्या दशकात अजय देवगन, शाहरुख खान, सलमान खान, अक्षय कुमार आणि आमिर खान या कलाकारांनी मागेपुढे आपल्या चित्रपट कारकिर्दीची सुरुवात केली.

आपल्या सर्वांमध्येच एक चांगलं नातं असल्याचं अजयनं नुकतंच एका मुलाखतीत सांगितलं. शाहरुख आणि माझ्यमाध्ये असणाऱ्या तणावाबद्दल माध्यमांमध्ये जे काही लिहिलं गेलं, तो वादच अस्तित्वात नव्हता असं शाहरुख म्हणाला.

अधिक वाचा  खाद्यतेलानंतर आता साखर होणार स्वस्त! .. कारखान्यांना बसणार फटका

‘आम्ही सर्वजण फोनवर संवाद साधतो आणि आमच्यामध्ये सर्वकाही ठीक आहे. जेव्हाही कोणा एकाला अडचणी येतात तेव्हा दुसरा तुम्हाला आधार देण्यासाठी तिथं असतो. आम्ही एकमेकांवर कायम विश्वास ठेवतो. कारण, जेव्हा समोरच्यानं आपल्याला हमी दिलेली असते तेव्हा तो तिथं असतो आणि काहीच अडचणी येत नाहीत’, असं तो म्हणाला.शाहरुखसोबत हाणामारी झालेल्या अफवांवर किंवा तत्सम वादावर प्रतिक्रिया देत अनेकदा माध्यमं आणि काही बेसावध चाहत्यांकडून अशा चर्चांना वाव दिला जातो, ज्यांना रोखणं अशक्य आहे अशी खंत त्यानं व्यक्त केली.

उदाहरणार्थ त्यांनी कधी एकदा आम्हाला हाणामारी करताना पाहिलं आणि त्यांनी तोच अंदाज बांधला की आम्ही हाणामारी करत आहोत. पुढे हीच अफवा आणि तो प्रसंगही तयार केल्याचं दर्शवत परिस्थिती कधीच बिनसली नसल्याचं अजयनं अधोरेखित केलं.बॉलिवूडमध्ये अजय आणि शाहरुख या दोन बड्या स्टार्समध्ये झालेला वाद पाहता, ही माहिती खरी असल्याच खरंच बॉलिवूडमधील हा सर्वात मोठा वाद असता. पण, तसं नाहीये… हेच काय ते सत्य.