उन्हाचा पारा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. उष्णता वाढत असल्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. अशामध्ये उकाड्यामुळे हैराण झालेल्यांना आनंदाची बातमी आहे. यावर्षी वरुणराजाची कृपा लवकर होणार आहे. देशात मान्सूनचे आगमन दहा दिवस आधीच होणार आहे. मान्सून 20 किंवा 21 मे रोजी केरळच्या किनारपट्टीवर  धडकणार आहे. त्यानंतर मान्सून पुढे पुढे सरकत काही दिवसातच देशाच्या उर्वरित भागात सक्रीय होणार असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. ‘युरोपियन सेंटर फॉर मीडियम-रेंज वेदर पॉडकास्ट’ या संस्थेकडून हा अंदाज वर्तवण्यात आला आह

मान्सून दरवर्षीपेक्षा लवकर दाखल होणार असल्याने ही शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण उन्हाचा चटका वाढल्याने अनेक ठिकाणी पाण्याची टंचाई भासत आहे. तसेच पिकांनाही पाण्याची गरज आहे, त्यामुळे अशा काळातच पाऊस पडणार असल्याने शेतकऱ्यांना हा दिलासा म्हणावा लागेल. दरम्यान, दरवर्षी मान्सून जूनच्या पहिल्या आठवड्यात केरळमध्ये दाखल होतो. यंदा दहा दिवस आधीच मान्सूनची बरसात सुरु होणार आहे. बंगालच्या उपसागरात झालेल्या हवामान बदलानुसार सध्या अरबी समुद्रात अँटी-सायक्लोन क्षेत्र तयार होत असल्याचे संकेत मिळतात. त्यामुळे मान्सून केरळमध्ये लवकर पोहचणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

अधिक वाचा  पुणेकरांनो सावधान: वायफाय आणि केबलचे काम असल्याचे सांगून एण्ट्री करायचा तरूण आणि...

दरम्यान, यंदा देशात सरासरीच्या 99 टक्के पाऊस पडणार आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने मान्सूनचा पहिला अंदाज 14 एप्रिलला जाहीर केला होता. त्यानुसार यंदा देशात पाऊसमान सामान्य राहण्याचा अंदाज आहे. यंदा देशात चांगला पाऊस राहणार असल्याने शेतकऱ्यांना एका प्रकारचा दिलासा मिळाला आहे. यंदा देशात सरासरीच्या 99 टक्के पाऊस होणार असल्यानं ही शेतकऱ्यांसाठी एक दिलासा देणारी बातमी आहे. कारण दरवर्षी शेतकऱ्यांना भारतीय हवामान विभागाच्या अंदाजाची प्रतिक्षा असते. त्यामुळे सगळे शेतकरी नेमका हवामान विभागाचा काय अंदाज येईल याची वाट बघत असतात. हवामान विभागाने अंदाज जाहीर केल्यानंतर आता युरोपियन सेंटर फॉर मीडियम-रेंज वेदर पह्रकास्ट या संस्थेने दहा दिवस आधीच मान्सून दाखल होणार असल्याचे म्हटले आहे.

अधिक वाचा  श्रीगोंद्यात काॅंग्रेस - राष्ट्रवादी आघाडी दुभंगणार? राहुल जगताप यांच्या हाती सुत्रे

यावर्षी देशात चांगला पाऊस पडणार असल्यामुळे बळीराजा सुखावला आहे. शेतकरी हवामान विभागाच्या अंदाजाची नेहमी आतुरतेने वाट पाहत असतात आणि आज मिळालेल्या माहितीनुसार मान्सून लवकर दाखल होणार आहे. शेतकऱ्यांसाठी ही खूपच आनंदाची बातमी आहे. कारण उन्हाचा तडाका वाढल्याने शेतीला पाणी कमी पडत आहे, अनेक ठिकाणी पाण्याची टंचाई सुरु झाली आहे. तर काही शहरी भागामध्ये पाणी कपात देखील सुरु झाली आहे. तसेच पिकांनाही पाण्याची गरज असते. त्यामुळे चांगला पाऊस होणे खूप गरजेचे असते. यावर्षी चांगला पाऊस होणार असल्याने सर्वच जण आनंदी झाले आहेत.