मुंबई : बारावीचा निकाल जूनच्या दुसर्‍या आठवड्यात म्हणजेच 10 जूनपर्यंत, तर दहावीचा निकाल जूनच्या तिसर्‍या आठवड्यात म्हणजेच 20 जूनपर्यंत जाहीर करण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातील अधिकार्‍यांनी ही माहिती दिली.

राज्य मंडळाने यंदा परीक्षा घेण्यावर ठाम राहत दहावी, बारावीच्या परीक्षा घेतल्या. काही तांत्रिक कारणांमुळे परीक्षांच्या वेळापत्रकात बदलदेखील करावे लागले.

यंदा दोन वर्षानंतर कोरोनामुळे परीक्षा ऑफलाईन घेण्यात आली आहे.तांत्रिक कारणास्तव परीक्षेच्या वेळापत्रकात फेरबदल देखील करावा लागला. यंदा दहावीची परीक्षा 15 मार्च ते 4 एप्रिल तर बारावीची परीक्षा 4 मार्च ते
7 एप्रिल पर्यंत झाल्या. आता परीक्षा नंतर उत्तरपुस्तिका तपासणी सुरु झाली असून 10 वी आणि 12 वी चा निकाल जूनमध्ये येणार.

अधिक वाचा  टेक्सासमध्ये शाळेत अंदाधुंद गोळीबार; 21 मृत्युमुखी