हैदराबाद : हैदराबादमध्ये काल संध्याकाळी पत्नीसह दुचाकीवरुन घरी जाणाऱ्या तरुणाची लोखंडी रॉडने बेदम मारहाण करण्यात आली. ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 25 वर्षीय कार सेल्समनला त्याच्या मुस्लिम  पत्नीच्या भावाने आणि नातेवाईकांनी बेदम मारहाण केली. बी नागराजू आणि सय्यद अश्रीन सुलताना यांचा तीन महिन्यांपूर्वी घरच्यांच्या इच्छेविरुद्ध विवाह झाला होता.

दरम्यान, बुधवारी रात्री 8.45 च्या सुमारास हे दाम्पत्य दुचाकीवरुन घरातून निघाले होते. त्याचवेळी दोन अज्ञात व्यक्तींनी नागराजू यांच्या डोक्यात लोखंडी रॉड मारला. घटनास्थळावरील फुटेजमधून हे सपशेल दिसून येत आहे. घटनास्थळी गर्दी वेगाने जमत होती, परंतु कोणीही त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला नाही. अनेकांनी ही घटना आपल्या मोबाईलमधील कॅमेऱ्यात कैद केली.

अधिक वाचा  माधुरीच्या चाहत्यांना धक्का! अभिनय सोडून घेतला ‘हा’ निर्णय

तसेच, व्हिडिओमध्ये नागराजू निपचित पडलेले दिसून येत आहेत. त्यांचे डोके रक्ताने माखले होते. तर दुसरीकडे, त्यांची पत्नी मदतीसाठी ओरडत होती. एका व्हिडिओमध्ये सुलताना हल्लेखोर नागराजवरील दुसरा हल्ला रोखण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. यानंतर तिथे उपस्थित लोकांनी हल्लेखोरांवर हल्ला केला, त्यानंतर ते तिथून पळून गेले. सुलतानाने नंतर हल्लेखोर आपला भाऊ असल्याचे ओळखले. काही सेकंदात सगळं संपलं. गजबजलेल्या रस्त्यावर नागराजूचा मृत्यू झाला, परंतु त्यांना कोणीही वाचवू शकले नाही.

या घटनेविषयी बोलताना सुलतानाने सांगितले की, “माझ्या डोळ्यांसमोर त्यांनी माझ्या पतीची हत्या केली. माझ्या डोळ्यासमोर त्यांना मारलं, मी काही करू शकले नाही. ‘सिग्नलवर खूप लोक होते, त्याला मारत राहिले, मी त्यांना सांगितले की मी त्याला सोडून देईल, तुम्ही ज्याच्याशी लग्न करायला सांगाल त्याच्याशी करेल. पण त्यांनी माझे ऐकले नाही. मी लग्न केले म्हणून त्यांनी नागराजूला मारले,”