पुणे : शिवसेना खासदार संजय राऊत यांची पुण्यात सभा पार पडली. या सभेत त्यांनी सेना स्टाईलने तुफान फटकेबाजी केली. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारची कामे, हिंदुत्व, राष्ट्रवादी आणि काँग्रेसबरोबरची दोस्ती, सध्या ट्रेंडिंग असलेला भोंग्याचा विषय ते नुकताच कोल्हापूर उत्तरचा लागलेला निकाल, अशा चौफेर विषयांवर राऊतांनी भाष्य केलं. कोल्हापूरच्या महाविकास आघाडीच्या विजयावर बोलताना, “अब चंपाकली मुरझायी हैं,कोल्हापुरातही पराभव झाला, त्यांना तिथेही जागा नाही”, असा टोला त्यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना लगावला.

‘अब चंपाकली मुरझायी हैं!’

शिवसेना खासदार संजय राऊत यांची पुण्यातील हडपसर येथे सभा पार पडली. या सभेत त्यांनी तुफान फटकेबाजी केली. कोल्हापूर उत्तरच्या विजयाबद्दल त्यांनी तमाम महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचं, पदाधिकाऱ्यांचं तसेच नेत्यांचे कौतुक केले. यावेळी त्यांनी चंद्रकांत पाटील यांना चिमटा काढला. “अब चंपाकली मुरझायी हैं, कोल्हापुरातही पराभव झाला, त्यांना तिथेही जागा नाही”, असा टोला राऊतांनी लगावला.
‘आता पुणे तिथे काय उणे….’ असं संजय राऊत म्हणताच सभेत बसलेल्या लोकांमधून चंद्रकांत पाटील…चंद्रकांत पाटील असा आवाज आला. यावेळी राऊत म्हणाले, “अब चंपाकली मुरझायी हैं, उनकी बात छोड दो… कोल्हापुरातही त्यांचा पराभव झाला”

अधिक वाचा  DAVOS मध्ये महाराष्ट्राची कामगिरी सरस; राज्याचे 80 हजार कोटींचे करार