पुणे:- आम्ही सारे ब्राह्मण पाक्षिक व ब्राह्मण व्यावसायिक पत्रिका मासिक या दोन्ही नियतकालिकांच्या वतीने देण्यात येणारा यावर्षीचा ब्राह्मण भूषण पुरस्कारअभिनेते शरद पोंक्षे यांना आणि यावर्षीचा इंदुमती-वसंत करिअर भूषण पुरस्कार युवा लेखक, दिग्ग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांना देण्यात येणार आहे. याप्रसंगी कॅप्टन निलेश गायकवाड (शिवसंघ प्रतिष्ठानचे संस्थापक) प्रमुख पाहुणे म्हणून तर शिरीष देशपांडे (मुख्य कार्यकारी अधिकारी, बुलडाणा अर्बन को. ऑप. क्रेडीट सोसायटी) अध्यक्ष म्हणून उपस्थित राहणार असल्याची माहिती मासिकाचे मुख्य संपादक भालचंद्र कुलकर्णी यांनी आज येथे दिली. मानपत्र, पुणेरी पगडी व उपरणे असे पुरस्काराचे स्वरुप असून पुरस्काराचे यंदाचे 8 वे वर्ष आहे.

अधिक वाचा  समाविष्ट गावांना मिळकतकर सवलत नाहीच; विधी चा अभिप्राय घेऊन निर्णय - आयुक्त

सदरच्या नियतकालिकांचा वर्धापनदिन समारंभ रविवार, दि. 8 मे, 2022 रोजी सायं. 5.30 वाजता आबासाहेब गरवारे महाविद्यालय सभागृह, पुणे येथे संपन्न होत आहे. या कार्यक्रमात श्री. शरद पोंक्षे लिखित मी आणि नथुराम या पुस्तकाच्या 10 व्या आवृत्तीचे लोकार्पण यावेळी होणार असून त्यांची प्रकट मुलाखत सुधीर गाडगीळ घेणार आहेत.