पुणे : प्रेयसीला लॉजमधील बाथरुममध्ये कोंडून तिच्या दीड वर्षाच्या मुलाचे अपहरण करून पळून नेणार्‍या प्रियकराला सहकारनगर पोलिसांनी लातूरमध्ये  पकडून मुलाची सुखरुप सुटका केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही महिला आणि पांढरे एकाच कंपनीत काम करीत असल्याने परिचय झाला. ते पुणे सातारा रोडवरील एका लॉजमध्ये १ ते ३ एप्रिलपर्यंत मुक्कामाला होते. त्यांच्याबरोबर फिर्यादी यांचा दीड वर्षाचा मुलगाही होता. मंगळवारी सकाळी त्यांच्यात वाद झाला. तेव्हा पांढरे याने या महिलेला बाथरूममध्ये कोंडले आणि तिच्या मुलाला घेऊन तो पसार झाला. महिलेने आरडाओरडा केल्याने लॉजच्या मॅनेजरने येऊन तिची सुटका केली. तिने तातडीने सहकारनगर पोलिसांकडे धाव घेत तक्रार दिली. घटनेचे गांभीर्य व मुलाच्या जिवाचा धोका लक्षात घेऊन पोलिसांनी तातडीने पांढरेचा शोध सुरू केला. तेव्हा तो एका बसने प्रवास करीत असल्याचे आढळून आले.

अधिक वाचा  झूठे इकट्ठे हों, तो सच्चा टूट जाता है', तारक मेहता सोडल्याच्या बातम्यांदरम्यान शैलेश लोढा यांची पोस्ट

ही बस लातूरला जात असल्याचे आढळून आले. त्याबरोबर पोलिसांनी बसचा पाठलाग सुरू केला. त्याला लातूर येथील एका लॉजमधून बुधवारी पहाटे पकडून मुलाची सुखरूप सुटका केली.

ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्वाती देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक समीर शेंडे, कर्मचारी बापू खुटवड, महेश मंडलिक, भुजंग इंगळे, महादेव नाळे, सुशांत फरांदे, सागर सुटकर, सागर शिंदे, प्रदीप बेडीसकर यांनी केली.