मुंबई : फरदिन खान बऱ्याच दिवसांपासून मोठ्या पडद्यावरुन गायब आहे. काही दिवसांपूर्वी अचानक वाढलेल्या वजनाचा त्याचा फोटो समोर आला होता यानंतर फरदिन खानने स्वत:च्या फिटनेसवर असं काम केलं की, तो पुन्हा जुन्या लूकमध्ये परतला. जेव्हा जुन्या लूकसह तो परत आला तेव्हा पुन्हा या चॉकलेट हिरोची आठवण त्याच्या चाहत्यांना झाली. त्याचा हा लूक पाहून चाहत्यांकडून कमेंट्सचा पाऊस पडत आहे.

ईद पार्टीमध्ये दिसला फरदीन खान
फरदीन खान कोणत्या चित्रपटात दिसून येईल याची अनेकांनाच उत्सुकता होती. परंतु आता हे स्पष्ट झाले आहे की, सलमान खान , अनिल कपूर सोबतच फरदीन खानची एन्ट्री सुद्धा ‘नो एन्ट्री 2’ या चित्रपटामध्ये होणार आहे.

अधिक वाचा  मविआनं ओबीसी आरक्षणाची हत्या केली; फडणवीसांचा हल्लाबोल

फरदीन खानचा नुकताच समोर आलेला फोटो ईदच्या कार्यक्रमातील आहे, जिथे तो त्याच्या चाहत्यांना भेटला, फरदीन खानमधील हा जबरदस्त बदल पाहून अनेकजण आश्चर्यचकित झाले. सोशल मीडियावर हुमा कुरैशीच्या ईद पार्टीमधील फरदीन खानचे हे फोटो वायरल होत आहेत. अनेकजण त्याच्या फोटोला कमेंट करत आहेत.