मुंबई : उत्तर प्रदेशमधील ललितपूर जिल्ह्यात बलात्काराची एक संतापजनक घटना घडली आहे. याचे पडसाद आता देशभर पसरले आहे. सामूहिक बलात्काराची तक्रार करण्यासाठी आलेल्या एका 13 वर्षीय अल्पवयीन मुलीवर पोलीस ठाण्यातही बलात्कार झाल्याचा आरोप आहे. पीडितेनं पोलीस स्टेशनच्या एसएचओवर सामूहिक बलात्काराचा आरोप केला आहे. याप्रकरणी आता प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुखने  ट्वीट करत कारवाईची मागणी केली आहे.

ट्वीटमध्ये रितेश देशमुख म्हणत आहे की, ”हे खरे असेल तर यापेक्षा वाईट काहीही असू शकत नाही. रक्षकच भक्षक झाला तर न्याय मागायला सामान्य माणसाने जायचे कुठे. अशा लोकांना भरचौकात सर्वांसमोर मारायला पाहिजे. यांच्यावर तात्काळ कारवाई करून कठोरात कठोर शिक्षा द्या…” अशी मागणी रितेश देशमुखने केली आहे.

अधिक वाचा  राज्यात तब्बल ६७४ शाळा अनधिकृत त्यात पुण्यातील २२ शाळांचा समावेश

उत्तर प्रदेशातील ललितपूर जिल्ह्यात सामूहिक बलात्काराची तक्रार करण्यासाठी आलेल्या एका अल्पवयीन मुलीवर पोलीस ठाण्यातही बलात्कार झाल्याचा आरोप आहे. 13 वर्षीय पीडितेने पोलीस स्टेशनच्या एसएचओवर सामूहिक बलात्काराचा आरोप केला. यानंतर स्टेशन हाऊस ऑफिसर टिळकधारी सरोजला  अटक करण्यात आली. या प्रकरणी स्टेशन प्रमुखासह सहा जणांविरुद्ध गुन्हा  दाखल करण्यात आला होता.

दरम्यान, आधी 4 जणांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला आणि नंतर जेव्हा ती तक्रार घेऊन पोलीस स्टेशनमध्ये पोहोचली तेव्हा एसएचओने पोलीस ठाण्यातच तिच्यावर बलात्कार केला.पोलीस ठाण्यातील इतर सर्व पोलिसांना यापूर्वीच ड्युटीवरून हटवण्यात आले आहे.असा आरोप पीडित तरुणीने केला.

अधिक वाचा  एका जागेची काँग्रेस यादी वाढतच चाललीय! राज्यसभेत कोण जाणार

या दरम्यान, याप्रकरणी पोलिस महासंचालक स्तरावर चौकशी सुरू असून 24 तासांत अहवाल सादर करण्यास सांगण्यात आले आहे.