रत्नागिरी : मशिदींवरील अनधिकृत भोंग्यांविरोधात मनसे आक्रमक आहे. मनसेचे राज्यात आंदोलन सुरू आहे. हे आंदोलन सुरू असताना आता मनसेचे राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर यांना धमकीचा फोन आला आहे. हा फोन परदेशातून आल्याचं सांगण्यात येत आहे. एका अज्ञात व्यक्तीने हा फोन केल्याचं बोललं जात आहे.

वैभव खेडेकर यांनी राज ठाकरे यांच्या आदेशानुसार कोकणात महाआरती आणि मशिदींवरील भोंगे उतरवण्यासाठी आंदोलन केले होते. या आंदोलनामुळेच धमकी देणारा फोन आल्याच वैभव खेडेकर यांचे म्हणणे आहे. वैभव खेडकर या फोनबाबत खेड पोलीस ठाण्यात तक्रार करणार आहेत.

वैभव खेडेकर मनसेचे कोकण विभागीय सरचिटणीस आहेत. यापूर्वी अनेक वेळा वैभव खेडेकर वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत आले आहेत. एखादे आक्रमक आंदोलन किंवा एखाद्या अधिकाऱ्याला मनसे स्टाइलने दिलेला झटका यामुळे वैभव खेडकर कायम चर्चेत असतात.

अधिक वाचा  'हाच फडणवीस तुमच्या सत्तेच्या (बाबरी) ढाच्याला खाली केल्याशिवाय राहणार नाही'