मंदिरा बेदीला आज कोण ओळखत नाही. अभिनेत्री, होस्ट अशा वेगवेगळ्या रूपात तिला प्रेक्षकांनी पाहिलं आहे.गतवर्षी जून महिन्यात मंदिराचा पती राज कौशल यांचं निधन झालं होतं.पतीच्या निधनानंतर मंदिरा पुरती कोलमडली होती. पण आता ती पुन्हा धीरानं उभी झाली आहे.अलीकडे मंदिरा तिच्या फिटनेसमुळे चर्चेत असते. मंदिराची एक खास ओळख आहे. ती म्हणजे, तिची हेअरस्टाइल. मंदिरा म्हटल्यानंतर आता जुनी मंदिरा डोळ्यांपुढे न येता, शॉर्ट हेअरमधील मंदिराच डोळ्यांपुढे उभी राहते.

ग्लॅमर इंडस्ट्रीत आली तेव्हा मंदिराचे केस बरेच लांब होते. ‘शांती’ या मालिकेत तुम्ही तिला तिच्या लांब केसांमध्ये बघितलं असेल. ‘दिलवाले दुल्हनियां ले जायेंगे’ या चित्रपटातही तिचे केस लांब होते.त्यानंतर काही वर्षांनंतर एका रिअ‍ॅलिटी शोदरम्यान वेगळीच मंदिरा लोकांपुढे आली. लांब केस कापून ती नव्या हेअरकटमध्ये दिसू लागली. तेव्हापासून आजपर्यंत तिचा तोच लूक कायम आहे.

अधिक वाचा  उध्वस्त केलेल्या मंदिराविषयी आता बोलून काहीही उपयोग नाही, ज्ञानवापी मशिदीच्या वादासंदर्भात सद्गुरूंचे भाष्य

इतके छान, लांब आणि कुरळे केस मंदिरानं का कापले असावेत? असा प्रश्न आजही चाहत्यांच्या मनात आहे. आता इतक्या वर्षानंतर खुद्द मंदिराने याचं उत्तर दिलं आहे.पिंकविलाला दिलेल्या एका खास मुलाखतीत ती लांब केसांबद्दल बोलली. मी माझ्या लांब केसांमुळे आनंदी नव्हते. समाजात अनेक गोष्टी चुकीच्या आहेत सिद्ध करायचे होते. माझे केस कुरळे होते आणि मला दररोज ते कुरळे केस स्ट्रेट करण्याची काळजी वाटत होती. म्हणून मी एके दिवशी सलूनमध्ये जाऊन माझे केस कापून घेण्याचं ठरवलं, असं ती म्हणाली.

ती पुढे म्हणाली, त्या दिवशी मी सलूनमध्ये गेले, तर त्या सलूनवाल्यालाही आश्चर्याचा धक्का बसला होता. तुला खरंच केस कापायचे आहेत? असं त्याने मला कित्येकदा विचारलं. मी हो म्हणाले, तरीही त्याने माझे केस खांद्यापर्यत कापले आणि उद्यापर्यंत पुन्हा विचार कर आणि मग ये, असं सांगून मला तिथून घालवलं.मी घरी परत आले. पण दुस-या दिवशी मी सलून उघडण्याआधीच पोहचले आणि त्याला माझे केस कापायला असं त्याला ठणकावून सांगितलं. अशा प्रकारे मी माझे केस लहान केले. गेल्या 12 वर्षांपासून माझे केस लहान आहेत, असं ती म्हणाली.

अधिक वाचा  संभाजीराजेंचा राज्यसभेचा मार्ग खडतर?; मतांची गणितं? वाचा सविस्तर

‘मी केस कापले आणि मला वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका मिळाल्या आहेत. याचा अर्थ आता लोकांनी मला एका सशक्त आधुनिक स्त्रीच्या भूमिकेसाठी निवडलं आहे. त्यामुळे माझे लहान केस माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. मला लहान केस आवडतात,असंही तिनं सांगितलं.

एखाद्या भूमिकेसाठी केस वाढवण्याची गरज पडलीच तर मी विचार करेन. पण सध्या तरी केस वाढवण्याचा माझा कुठलाही इरादा नाही, असं तिने सांगितलं.