जालना: भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे नेहमीच त्यांच्या वक्तव्यामुळे चर्चेत असतात. आता पुन्हा एकदा दानवे यांनी एक वक्तव्य केलं आहे. 3 मे रोजी जालना येथे झालेल्या परशुराम जयंतीच्या कार्यक्रमात बोलताना “मला एका ब्राह्णाला राज्याचा मुख्यमंत्री झालेलं पाहायचं आहे,” असे वक्तव्य दानवेंनी केले. त्यांच्या या वक्तव्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा होत आहे. अशातच दानवे यांच्या या वक्तव्याला शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांनी प्रत्युत्तर दिलंय.

रावसाहेब दानवेंनी आपल्या भाषणात ब्राह्मण समाजातील व्यक्तीला महाराष्ट्राचे नेतृत्व देण्याची इच्छा व्यक्त केली. यावेळी त्या कार्यक्रमात अर्जुन खोतकर देखील उपस्थित होते. दरम्यान, दानवे यांच्या वक्तव्यावर प्रत्युत्तर देताना शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांनी टोला हाणला. “आताचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे देखील ब्राह्मण समाजातील आहेत. यापूर्वी मनोहर जोशी मुख्यमंत्री होते, ते देखील ब्राह्मण समाजातीलच होते. त्यामुळे, दानवे यांनी ब्राह्मण समाजातील व्यक्तीला मुख्यमंत्री करू म्हणण्याची भानगड सोडून द्यावी. आताचे मुख्यमंत्री तेच आहेत. देवेंद्र फडणवीस होतील तेव्हा होतील” असंही खोतकर म्हणाले.

अधिक वाचा  अविनाश भोसले यांना CBI कडून अटक; येस बॅंक व डीएचएफएल प्रकरणी तपास होणार