जालना : केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे आपल्या वेगवेगळ्या वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असतात.आता देखील रावसाहेब दानवे यांनी असेच एक सर्वांचे लक्ष वेधून घेणारे वक्तव्य केले आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळातील सर्वांच्या भुवया उंचावल्या गेल्या आहेत.

परशुराम जयंतीनिमित्त आयोजित एका कार्यक्रमात बोलत असताना, “ब्राह्मण समाज सर्व समाजाला दिशा देणारा आहे. केवळ नगरसेवक, नगराध्यक्ष या पदांवर काम करणाऱ्या ब्राह्मण समाजाला आता आपण पाहू नये. अशा एवढ्या छोट्या अपेक्षा व्यक्त करू नका. राज्याच्या मुख्यमंत्रिपदावर ब्राह्मण व्यक्ती बसवण्यासाठी प्रयत्न करणार आहोत” असे रावसाहेब दानवे यांनी म्हणले आहे.

अधिक वाचा  पुण्यात दिवसाढवळ्या सराफा व्यापाऱ्यावर सशस्त्र हल्ला

पुढे बोलताना, “जातीपातीचे लोण राजकारणात आता मोठ्या प्रमाणात आले आहे. हे वास्तव नाकारून आता चालणार नाही. जात एकसंघ असली पाहिजे, तसे पूर्ण समाजाला एकत्र ठेवणारा नेता असावा. तसे नेतृत्व आपण निर्माण केले पाहिजे” असेही त्यांनी म्हणले आहे.

दरम्यान या कार्यक्रमात बोलताना, “येत्या नगर परिषदेच्या निवडणुकीत ब्राह्मण समाजाच्या उमेदवारांना तिकीट देण्यासाठी प्राधान्य द्यावे” अशी मागणी परशुराम जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष सुनील किनगावकर यांनी केली होती. याविषयावर भाष्य करताना रावसाहेब दानवे यांनी “मुख्यमंत्रिपदावर ब्राह्मण व्यक्ती बसवण्यासाठी प्रयत्न करणार आहोत” असे म्हणले आहे.