पुणे : उद्या शिवसेना खासदार संजय राऊत पुणे दौऱ्यावर असणार आहेत. यावेळी राऊत यांची उद्या पुण्यामध्ये जाहीर सभा होणार आहे, अशी माहिती शिवसेना शहर अध्यक्ष संजय मोरे यांनी दिली आहे.

एकीकडे राज ठाकरेंच्या मशिदींवरील भोंग्यांवरून राज्यातील वातावरण ढवळून निघालेले असताना राऊत यांची सभा होत आहे. त्यामुळे या सभेमध्ये राऊत नेमकं काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष आता लागून राहिले आहे. हडपसर येथील विठ्ठलराव तुपे सभागृहात शिवसेनेकडून या सभेचे आयोजन करण्यात आले असून, आगामी पालिका निवडणुका आणि सद्यस्थितीवरील राजकारणावर संजय राऊत भाषण करणार असल्याचे बोलले जात आहे.

अधिक वाचा  अभिनेता पुष्कर जोग यांच्या आईवर पुण्यात गुन्हा दाखल, शिक्षण क्षेत्रात खळबळ