पुणे : हॉटेलमध्ये एका टेबलावर बसलेल्याचे दुसर्‍याशी भांडणे झाले. त्या भांडणातून त्याने मित्रांना बोलावले. मात्र, भांडणासाठी काही संबंध नसताना आलेल्या मित्रांनी माजंरीच्या सरपंचावर गोळीबार करुन त्यानंतर त्यांना दगड, विटांनी मारहाण केल्याने ते जबर जखमी झाले आहेत.

पुरुषोत्तम ऊर्फ अण्णा धारवाडकर असे मांजरीच्या सरपंचाचे नाव आहे. धारवाडकर यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हडपसर पोलिसांनी नंदू शेडगे, चंद्रकांत घुले व त्यांच्या तीन मित्रांवर खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. ही घटना मांजरीमधील श्रीराम हॉटेलमध्ये रात्री साडेनऊ वाजता घडली.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुरुषोत्तम धारवाडकर हे काही जणांसह रात्री श्रीराम हॉटेलमध्ये जेवणासाठी गेले होते. त्यांच्या टेबलवर बसलेल्या संजय झुरंगे याचे चंद्रकांत घुले याच्याबरोबर भांडणे झाले. धारवाडकर यांचा त्याच्याशी काही संबंध नव्हता. भांडणानंतर घुले याने फोन करुन साथीदारांना बोलावून घेतले. धारवाडकर जेवण करुन हॉटेलमधून बाहेर पडत असताना तिघे जण मोपेडवरुन तेथे आले. त्यांच्यातील एकाने धारवाडकर यांच्या दिशेने गोळीबार केला. ती गोळी धारवाडकर यांना लागली नाही. त्यानंतर त्यांनी तेथे पडलेल्या दगड, विटांनी धारवाडकर यांना मारहाण केली. दगड डोक्यात घातल्याने त्यात ते जबर जखमी झाले. त्यानंतर त्यांनी तेथे जमलेल्यांना धमकावून ते पळून गेले. लोकांनी धारवाडकर यांना तातडीने नोबेल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहे.

अधिक वाचा  शिवसेनेची संभाजीराजे छत्रपती यांना जागा; त्यापेक्षा शिवसेना काय करु शकते - संजय राऊत

याबाबत अण्णा धारवाडकर यांनी सांगितले की, या भांडणाशी आपला काही संबंध नव्हता. तो केवळ मी बसलेल्या टेबलावर बसला होता. चंद्रकांत घुले व नंदू शेडगे हे ओळखीचे असून त्यांच्या मित्रांनी केलेल्या मारहाणीमुळे डोक्याला जखम झाली आहे. डॉक्टरांनी ८ ते ९ टाके घातले आहे. हडपसर पोलिसांनी खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरु आहे.