पुणे: माऊली म्हेत्रे: राज्यातील बहुसंख्य लोकांनी असंख्य आंदोलने पाहिली असतील पण कुठेही जाळपोळ नाही, किंवा तोडफोड नाही परंतु प्रभाव मात्र पूर्ण राज्यभर….. अन् ८०% कार्यकर्त्यांची सुटका ही अनोखी किमया साधत आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने राज्यभर हायटेक आंदोलन करण्यात आले. औरंगाबाद येथील जाहीर सभेमध्ये राजसाहेब ठाकरे यांनी थेट राज्य सरकारच्या विरोधात आंदोलनाची हाक दिल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आज झालेल्या आंदोलनाचे योग्य नियोजन केले. ज्याची चर्चा सध्या महाराष्ट्र मध्ये सुरू आहे ते म्हणजे पूर्ण महाराष्ट्र राज्यात आंदोलन झाले परंतु किमान 80 टक्के कार्यकर्त्यांची सुटका त्याही किरकोळ समज देऊन झाल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या या अनोख्या आंदोलनाची चर्चा सध्या सुरू आहे.

राज ठाकरे यांच्या आदेशानुसार आज राज्यभर आंदोलन केले जात असताना कार्यकर्त्यांना त्रास न होण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या जनहित कक्ष व विधी विभागाच्या मार्फत राज्यभर आवश्यकता ठिकाणी अटक झाल्यानंतर त्वरित न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी एक स्वतंत्र यंत्रणा उभारण्यात आली होती. त्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या जनहित व विधी विभागाच्या मार्फत महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये पुणे मुंबई-नाशिक या तीन मुख्य शहरांसह अन्य शहरांमध्येही वकील सेवा देण्यासाठी कार्यकर्ते उपस्थित करण्यात आले होते. त्यामुळे राज्यभर यामध्ये कोणत्याही कार्यकर्त्यांसह अटक झाल्यानंतर वेगळी तयारी करण्याची कार्यकर्त्यांना गरज भासली नाही तर फक्त अटक झाल्याचे समजताच काही मिनिटांमध्ये संबंधित पोलिस ठाण्यांमध्ये पोचणारे वकील हे मनसेच्या आंदोलनाचे एक वेगळेपण आहे.

अधिक वाचा  राज ठाकरेंचा अयोध्या दौरा स्थगित, बृजभूषण सिंहांनी केले हे विधान..

महाराष्ट्र राज्यात मनसे अध्यक्ष राज साहेब ठाकरे यांनी आंदोलनाची हाक दिल्यानंतर विरोधक आपल्या मुलांच्या भविष्याचा विचार करून आंदोलनात सहभागी न होण्याची सूचना देत होते. त्यातच संबंधित विषय हा सामाजिक तेढ आणि धार्मिक भावना या विषयाशी निगडित असल्याने कट्टर कलमे लागण्याची शक्यता सर्वच कार्यकर्त्यांना असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या विधी व जनहित कक्षाच्या वतीने चोख नियोजन करत एक अनोख्या आंदोलनाची संकल्पना महाराष्ट्राच्या समोर मांडलेली आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे वारंवार भोंगा आंदोलन हे सामाजिक विषय असून यामध्ये जातीय तेढ किंवा अन्य कोणत्याही भावनांचा समावेश करू नका असे सांगत असतानाही कार्यकर्त्यांच्या मनामध्ये पोलिसांच्या कडून कठोर कारवाई होण्याची भीती वाटत होती. आज राज्यभरात दिवसभर असंख्य कार्यकर्त्यांना पोलीस ताब्यात घेत असताना प्रदेश सरचिटणीस आणि जनहित कक्ष व विधी विभाग अध्यक्ष ॲड. श्री किशोर शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनानुसार काम करत असलेल्या राज्यातील सर्व वकील पदाधिकारी लोकांनी योग्य नियोजन करत सर्व पदाधिकारी लोकांच्या समस्या सोडवण्याचे काम केले.

अधिक वाचा  ठाकरेंनी 'ते' आव्हान स्विकारलं?; पुण्यात येऊन रणशिंग फुंकणार

महाराष्ट्राच्या निवडक भागातील आलेल्या काही प्रतिक्रिया….

ठाणे

मी ॲड आशिष धुरी आज विक्रोळी न्यायालयात FIR no 385 /22 मध्ये अरविंद गीते व अक्षय महाकाळ ह्या मनसैनीकांच्या अटक प्रकरणात मनसे जनहित कक्ष व विधी विभागातर्फे न्यायालयीन लढाईत प्रभावी युक्तीवाद केला. मनसैनिकांची बॉन्ड घेऊन सुटका केली व माझे सहकारी ॲड.वसंत प्रभू,,ॲड.प्रांजल जाधव, सौ.आकांक्षा गांधी, ॲड.आकाश पावसकर, ॲड.स्मिता परब, ॲड.प्रथमेश, श्री.उदय मयेकर उपस्थित होते.

ॲड. आशिष धुरी
चिटणीस, जनहित कक्ष-विधी विभाग

बदलापूर शहर मधील सर्व पदाधिकारी यांना १४ दिवसाच्या undertaking वर सुटका करणारे आपले वकील बंधू ॲड. कल्पेशजी माने आणि टीमचा कोर्टामध्ये पेढे भरवून अभिनंदन करताना मनसे सर्व सेलचे पदाधिकारी…💐💐

अधिक वाचा  राहुल गांधी पुन्हा पक्षातील नेते साथ सोडताना परदेश दौऱ्यावर

उत्तर मध्य मुंबई लोकसभा

प्रदेश सरचिटणीस आणि जनहित कक्ष व विधी विभाग अध्यक्ष ॲड श्री किशोर शिंदे साहेबांच्या आदेशानुसार, आज वांद्रे न्यायालयात खेरवाडी पोलीस ठाणे आणि निर्मल नगर पोलीस ठाणे प्रकरणात 9 मनसैनीकांच्या अटक प्रकरणात मनसे जनहित कक्ष व विधी विभागातर्फे न्यायालयीन लढाईत प्रभावी युक्तीवाद. सर्व मनसैनीकांची बॉन्ड घेऊन सुटका.

उपस्थित वकील, ॲड संतोष शिंदे, ॲड लिंगेश बोमर,ॲड सुवर्णा पार्ले, ॲड अखिलेश गुप्ता, ॲड अमित पांडे, ॲड महेश शेट्ट्यार. अटक झालेले महाराष्ट्र सैनिक निर्मल नगर पोलीस ठाणे
1)रुपेश मालुसरे 2)मंगेश राणे 3) सुशांत पाटील
4) अनिल शेलार 5) सचिन पवार 6)गणपत मुरदगे

खेरवाडी पोलीस ठाणे बांद्रा
1) मनोज बापर्डेकर 2) निलेश माने 3) ओमकार रेडकर

जनहित कक्ष व विधी विभाग महाराष्ट्र नवनिर्माण सेना जनहित आणि विधी विभाग सदैव सज्ज.