महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार पुणे शहरात महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते. वारजे भागातही मोठ्या प्रमाणात महाआरतीचे आयोजन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने सुरू असतानाच डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातून पुणे पोलिसांच्या पथकाने पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेऊन वारजे पोलिसांच्या हवाली केले.

वारजे भागामध्ये महाआरतीचे नियोजन सुरू असतानाच पोलीस उपायुक्त यांच्या पथकाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संपर्क कार्यालयमध्ये थेट धाड मारत महाआरती चे नियोजन करणाऱ्या सर्व मनसे कार्यकर्त्यांना ताब्यात घेत प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे.

बाबासाहेब आंबेडकर चौक येथून कैलास दांगट (उपशहर अध्यक्ष ) विजय मते, शिवाजी मते, नितिन वांजळे, सुनील कोरपड़े, रियाज़ शेख़, गणेश धुमाळ, चंदन कड़, विजय इंगळे, प्रवीण सोनवणे, मनोहर पाटील, सौ.सोनाली पोकळे, सौ.प्रितीताई अड़के, अॅड अरविंद मते ह्यांना ताब्यात घेतले.

अधिक वाचा  तिच्या बांगड्या काढू नका, कुंकु पुसू नका..; अंत्यविधीवेळी रुपाली चाकणकरांनी पुढाकार घेतला अन्...

मनसे अध्यक्ष राज साहेब ठाकरे यांच्या आदेशानंतर वारजे भागामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी परिसराची रेकी करत असल्याची माहिती वारजे पोलिसांना होती. पदाधिकारी लोकांचा अंदाज घेवून वारजे भागामध्ये पोलीस बंदोबस्त कडक ठेवण्यात आला होता.

परिसरामध्ये पोलिसांचा तगडा बंदोबस्त असतानाही दुपारी एक वाजता वारजे भागात तीन ठिकाणी मनसैनिक आरती करण्याची खबर पोलिसांना लागल्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातून पोलिसांनी सर्व मनसे पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेतले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या अधिकृत व्हाट्सअप ग्रुप वरती सकाळी वाजता वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे जमण्याचा निरोप असल्याची माहिती मिळाल्यानंतर  पोलिसांनी संबंधित पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेऊन अटक केली.

अधिक वाचा  'सगळी प्रॉपर्टी विकली तरी...' वडीलांच्या आठवणीत वसंत मोरेंची भावूक पोस्ट

वारजे पोलिसांनी संबंधित पदाधिकाऱ्यांना पोलीस स्टेशनमध्ये 149च्या नोटिशा दिल्या असून त्यानंतर सोडून देण्यात आले.