बिग बॉस 5′ मध्ये दिसलेली अभिनेत्री पूजा मिश्रा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. तिने चक्क सुप्रसिद्ध अभिनेते आणि तृणमूल काँग्रेसचे  लोकसभा खासदार शत्रुघ्न सिन्हा आणि त्यांच्या कुटुंबियांवर गंभीर आरोप केले आहेत. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत पूजा मिश्राने सिन्हा कुटुंबावर तिचं करिअर आणि आयुष्य उद्ध्वस्त केल्याचा आरोप केला. एवढेच नाही तर पूजाने शत्रुघ्न सिन्हा आणि कुटुंबीयांनी तिच्यासोबत ‘सेक्स स्कॅम’ केल्याचा दावाही केला आहे. शत्रुघ्न सिन्हा यांनी मला बेशुद्ध करून माझ्या शरीराचा व्यापार करत माझे कौमार्य विकले आणि या सेक्स स्कॅमच्या आधारे स्वत:ची मुलगी सोनाक्षी हिला स्टार बनवले. हा अत्याचार मी 17 वर्षांची असल्यापासून सहन केला आहे. माझ्या जागी दुसरी कोणी असती तर तिने आत्महत्या केली असती, असा गौप्यस्फोटही तिने यावेळी केला आहे.

पूजा मिश्राच्या या आरोपांनी बॉलिवूड आणि राजकीय वर्तृळात खळबळ उडाली आहे. पूजा मिश्राने या मुलाखतीत शत्रुघ्न सिन्हा आणि त्यांच्या कुटुंबीयांवर जे आरोप केले आहेत, ते अतिशय धक्कादायक आहेत. मात्र, यावर शत्रुघ्न सिन्हा किंवा त्यांच्या कुटुंबीयांकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

अधिक वाचा  उजनी धरणात ६ टीमएसी साठा; सोलापूरसाठी ११० किमीची जलवाहिनी होणार

पूजा मिश्रा म्हणाली, ‘बॉलीवूडमधील एका कुटुंबाने माझे करिअरच नाही तर वैयक्तिक आणि आर्थिक आयुष्यही उद्ध्वस्त केले. मी शत्रुघ्न सिन्हा यांच्याबद्दल बोलतोय. ते माझ्या वडिलांचे खूप चांगले मित्र होते. माझे वडील आयकर आयुक्त होते आणि त्यांनी शत्रुघ्न सिन्हा आणि त्यांच्या संपूर्ण मित्र मंडळासाठी 100-100 कोटींची मदत केली. दोन दशके झाली पण हात धुवून हे कुटुंब माझ्यामागे लागले आहे. माझे वडीलांचे मुंबईत पोस्टींग होते, तेव्हा पूनम सिन्हा यांनी त्यांचे ब्रेनवॉश केले. बॉलीवूडमध्ये फक्त वेश्याच काम करतात असं त्यांनी म्हटलं होतं. पण आज त्यांचीच मुलगी सोनाक्षी सिन्हा बॉलीवूडमध्ये काम करत आहे. त्यांनी माझा पत्ता कट करण्यासाठी माझ्या वडिलांचे कान भरले.’

पूजा मिश्रा  पुढे म्हणाली की, 2005 मध्ये माझे वडील निवृत्त होऊन पुण्यात आले तेव्हा पूनम सिन्हा आणि शत्रुघ्न सिन्हा यांनी मला उघडपणे दडपले. उलट मी जेव्हा व्हिडिओकॉनच्या गेस्ट हाऊसमध्ये राहायचे तेव्हा पूनम सिन्हा आणि शत्रुघ्न सिन्हा माझ्यावर काळी जादू करायचे. मी त्यांच्यापेक्षा जास्त प्रसिद्ध होऊ नये ही असुरक्षितता त्यांच्या मनात नेहमी असायची. म्हणूनच आज जेव्हा मी मागे वळून पाहते तेव्हा या लोकांनी माझे 35 चित्रपट चोरल्याचे मला जाणवते. या लोकांनी माझे मार्ग रोखले. स्वतःला वाचवण्यासाठी हे लोक मला खोटी माहिती देतात. तुझ्याबाबतीत आम्ही काही नाही केले असे सांगून सलमान खान आणि शाहरुख खानने तुला उद्ध्वस्त केल्याचे ते सांगतात.

अधिक वाचा  'बालगंधर्वच्या प्रयोगानंतर urine इन्फेक्शन घेऊन मी घरी जाते'; विशाखा सुभेदार ची दुरावस्था सांगणारी पोस्ट

पूजा मिश्राने शत्रुघ्न सिन्हा आणि पूनम सिन्हा हे ‘लोभी’ आणि ‘राक्षस’ असल्याचे म्हटले आहे. ती म्हणाली की, ‘2009 मध्ये मी शत्रुघ्न सिन्हांच्या घरी गेले होते. त्याचा वाढदिवस येणार होता म्हणून मी त्याच्यासाठी भेट म्हणून मेणबत्त्या घेतल्या होत्या. बॉलिवूड इंडस्ट्री असुरक्षित आहे हे सर्वांनाच माहीत आहे, पण पूनम सिन्हा वेगळ्या पातळीवर असुरक्षित आहेत. त्यावेळी एका मुलीने मला काहीतरी खायला दिले आणि माझ्यावर काळी जादू केली. याची कल्पनाही कोणी करू शकणार नाही. यावरून हे लोक किती लोभी आणि राक्षसी आहेत हे दिसते.’

अधिक वाचा  राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर जहरी टीका; शाम देशपांडे यांचा अखेरचा जय महाराष्ट्र

पूजा मिश्रा पुढे म्हणाली, ‘2007 ते 2014 पर्यंत मी लोखंडवाला येथील माझ्या फॅमिली अपार्टमेंटमध्ये राहत होते. शत्रुघ्न सिन्हा यांचे संपूर्ण कुटुंब त्या अपार्टमेंटच्या वरच्या मजल्यावर राहत होते. मी सिंगापूरहून खरेदी करून यायचे, तेव्हा हे लोक माझ्या घरात घुसून माझ्या वस्तू चोरायचे. माझ्या वस्तू आणि कपडे सोनाक्षी सिन्हाला देऊन त्या कपड्यावरचे फोटो पेपरमध्ये छापून आणायचे. त्यांनी माझ्यासोबत एकाच घरात सेक्स स्कॅम चालवायला सुरुवात केली. या लोकांनी बेशुद्धावस्थेत माझा कौमार्य विकण्यास सुरुवात केली. त्यातून त्यांनी पैसे कमवले. सोनाक्षी सिन्हाला स्टार बनवले, असे गंभीर आरोपांची माळच शत्रुघ्न सिन्हा यांच्या विरुद्ध पूजाने लावली आहे.