मुंबई : बॉलीवूडचा प्रसिद्ध निर्माता, दिग्दर्शक करण जोहरचा ‘कॉफी विथ करण’ हा रिअॅलिटी शो प्रचंड गाजला. या शोमध्ये कलाकारांच्या अनेक सिक्रेट्सची करणने पोलखोल केली, त्यामुळे हा शो कायम चर्चेत राहीला.लोकांना आवडू लागला. अलिकडे ‘कॉफी विथ करण’ हा शो पुन्हा कमबॅक करत असल्य़ाची चर्चा होती मात्र करणने इंस्टावर एक पोस्ट टाकत य़ा चाहत्यांना हिरमोड केला आहे.

गेल्या काही आठवड्यांपासून करण जोहरचा ‘कॉफी विथ करण’ हा रिअॅलिटी शो कमबॅक करत असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. सोशल मीडियावर याबाबत बरीच चर्चा रंगली होती. मात्र करणने पोस्ट टाकत या सगळ्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. नुकतेच करण जोहरने आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन एक घोषणा केली. जी वाचून त्याचे चाहते थक्कच झाले. त्यांनी असे का केले याबाबत त्यांना चाहते कमेण्ट बॉक्समधून विचारत आहेत.

अधिक वाचा  महापालिका प्रभाग आरक्षण सोडतीची तारीख ठरली; OBC आरक्षणाशिवाय सोडती होणारं

करण जोहरने आपल्या ट्विटर अकाऊंटवर एक पोस्ट केली आहे. त्या पोस्टमध्ये त्याने लिहीले की, मित्रांनो, कॉफी विथ करण हे माझ्या आणि आपल्या आयुष्यातील महत्वाचा हिस्सा आहे. या शोचे सहा सिझन आले आणि या शोने एक वेगळा प्रभाव पाडला. पण मन घट्ट करत मला सांगावे लागत आहे की, हा शो आता इथपर्यंतच आहे. हा शो आता पुन्हा दिसणार नाही. 2019 साली ‘कॉफी विथ करण’चा 6 वा सिझन रिलीज झाला होता.