महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार पुणे शहरात महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते. कोथरूड भागात मोठ्या प्रमाणात महाआरतीचे आयोजन सुरू असतानाच कोथरुड पोलिसांनी कर्वे पुतळा येथून कोथरूड विभाग अध्यक्ष सुधीर धावडे, उपविभाग अध्यक्ष नितीन गायकवाड, दत्ता पायगुडे, महेश पाठक शाखाअध्यक्ष चेतन चव्हाण, किरण जाधव, सुशांत भुजबळ ह्यांना ताब्यात घेतले.

कोथरूडचे ग्रामदैवत मतोबा मंदिर आणि कोथरूड मशीद शेजारी शेजारी लागून असल्यामुळे या भागात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांकडून आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्य पदाधिकारी आणि कोथरूड पोलीस पाटील यांच्यातील साम्यजास्यामुळे १५ दिवसांपुर्वीच आवाज बंद करण्यात आला असल्याचे पोलीस पाटील पटेल यांनी सांगितले. पोलीस बंदोबस्त कडक असतानाही साध्या वेशातील पोलिस मनसैनिकांनी वरती नजर ठेवून होते. त्यानंतर दुपारी एक वाजता रस्त्यावरील मारुती मंदिरात नियोजन केले जाण्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या अधिकृत व्हाट्सअप ग्रुप वरती सकाळी साडेअकरा वाजता कर्वे पुतळ्यावर जमण्याचा निरोप असल्याची माहिती मिळाल्यानंतर  पोलिसांनी संबंधित पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेऊन अटक केली.

अधिक वाचा  गव्हाची निर्यात तत्काळ बंद; केंद्राचा मोठा निर्णय!

कोथरूड पोलिसांनी संबंधित पदाधिकाऱ्यांना पोलीस स्टेशनमध्ये नोटिशा दिल्या असून त्यानंतर सोडून देण्यात आले.