मुंबई – काही सूचना आत्ताच द्यायच्या असल्याने संध्याकाळऐवजी आत्ता पत्रकार परिषद घेतली. महाराष्ट्रभरातून आणि बाहेरुनही आम्हाला फोन येत आहेत. पोलिसांचेही फोन येत आहेत. पोलीस आमच्या कार्यकर्त्यांवर कारवाई करत आहेत. पण हे फक्त आमच्या बाबतीत का होत आहे?, असा सवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी केलाय. ते मुंबई पत्रकार परिषदेत बोलत होते.

सामंजस्याने हाताळला तर हा विषय सर्वांचा आहे. आमच्यामुळे 92 टक्के अजान झालं नाही असं आमचं म्हणणं नाही, असं राज ठाकरे म्हणालेत. तसेच जोपर्यंत भोंगे उतरवले जात नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरु राहणार, असं त्यांनी म्हटलंय.

अधिक वाचा  पेट्रोल-डिझेलवरील व्हॅट कपात म्हणजे 'उंटाच्या तोंडात जिरे'; फडणवीसांची टीका

जे कायद्याचं पालन करत आहेत त्यांना तुम्ही शिक्षा देणार आणि करत नाही त्यांना मोकळीक देणार, अशा शब्दांत राज ठाकरेंनी सरकारवर टीका केली आहे.

मुंबईत 1140 मशिदी असून त्यापैकी 135 मशिदींवर पाच वाजण्याच्या आधी अजान लावण्यात आली. विश्वास नांगरे पाटील यांनी फोन करुन सर्वांशी चर्चा झाल्याचं सांगितलं होतं. मग या मशिदींवर कारवाई होणार की फक्त आमच्या मुलांनाच उचलणार आहात, असंही राज ठाकरे म्हणाले.

मुंबई-महाराष्ट्रात ज्या मशिदी आहेत, त्यापैकी बहुतांश मशिदी या अनधिकृत, त्यावरील भोंगे अनधिकृत, त्याला सरकार परवानगी देतं कशी?, असा सवाल राज यांनी केला.