पुणे – कात्रज परिसरातील जांभुळवाडीत असलेल्या अर्जुन जलतरण तलावात बुडून सोळा वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी संध्याकाळी घडली आहे. याप्रकरणी तलावाचे मालक, चालक आणि सुरक्षारक्षकांविरूद्ध भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तलाव व्यवस्थापनाच्या बेजबाबदारमुळे ही दुर्घटना घडल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.

सोमेश रेड्डी राठोड (वय १६, रा. साईनगर, कात्रज) असे मृत्युमुखी पडलेल्या मुलाचे नाव आहे. याप्रकरणी तलावाचे मालक बाळासाहेब बबन जांभळे, चालक सुरेश बाळासाहेब जांभळे (दोघेही रा. जांभुळवाडी) सुरक्षारक्षक बन्सी नावडे, दुर्गेश जांभळे, प्रेम वासकले यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रेड्डी गोबरिया राठोड (वय ५५ रा. साईनगर, कात्रज) यांनी तक्रार दिली आहे.

अधिक वाचा  वैष्णव मांदियाळीला कैक अडथळे; परी मनी आस पाहू रूप तुझं सावळे...

जांभुळवाडी परिसरात बाळासाहेब जांभळे यांचा अर्जुुन जलतरण तलाव आहे. सोमवारी दुपारी सोमेश जलतरण तलावात पोहण्यास गेला होता. त्यावेळी तलावामध्ये अनेक मुले पोहत होती. पोहताना दमछाक झाल्यामुळे सोमेश पाण्यात बुडाला. तब्बल अर्धा ते पाउण तासानंतर सोमेश तलावात न दिसल्यामुळे तो बुडाल्याचे एका मुलाच्या लक्षात आले. त्यानंतर त्याने जलतरण तलावाच्या व्यवस्थापनाला माहिती दिली. मात्र, तोपर्यत सोमेशचा मृत्यू झाला होता. काही वेळानंतर त्याचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आला. तलावातील पाण्याची खोली आणि सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून सुचनांचे फलक न लावल्याचे दिसून आले. त्याशिवाय मुलांचे ट्रेनर आणि सुरक्षारक्षक यांनी निष्काळजीपणा केला. त्यामुळे सोमेशचा बुडून मृत्यू झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

अधिक वाचा  तब्बल 3 कोटी रुपये थकबाकीप्रकरणी तुळशीबागेतील व्यावसायिकांवर कारवाई

अनधिकृत तलाव असल्याची शक्यता
महापालिकेत जवळच्या गावांचा समावेश करण्यात आल्यामुळे जांभुळवाडीतील सव्र्हे क्रमांक ६९ मध्ये अनधिकृत जलतरण तलाव उभारण्यात आला. त्याची नोंद पुर्वीच्या गावठाणातील सातबाNयावर लावण्यात आली नसल्याचा आरोप स्थानिक तक्रारदाराने केला आहे. त्यामुळे त्याठिकाणी जीवितहानी होण्याची शक्यता असल्याची तक्रार एकाने १९ एप्रिलला पुणे महानगरपालिकेकडे केली होती. मात्र, महापालिवेâकडून संबंधित अर्ज पीएमआरडीकडे पाठविण्यात आल्याचे सांगण्यात आले.