मुंबई : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी चार मे म्हणजे भोंगे बंद करण्याचा इशारा दिला आहे. त्यावरून उद्यापासून भोंग्याचा गोंगाट बंद होईल, अशी अपेक्षा व्यक्त करत भोंग्याच्या वादात उडी घेतली. पण त्यामुळे ट्रोल होऊ लागल्याने प्राजक्ताला हे ट्विट डिलीट करावे लागले.

प्राजक्ता माळी हिने आज ट्विट करून आज 3 तारीख उद्यापासुन गोंगाट बंद होईस असे, म्हणत सगळ्यांना अक्षय्य तृतीयेच्या तसेच मुस्लिम समाजबांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या मात्र, या ट्विटवरून ती ट्रोल झाली आणि तिने ट्विट लगेचच डिलीट केले.

प्राजक्ता आपल्या ट्विटमध्ये म्हणाली होती की, सगळ्यांना सुख, समाधान, ऐश्वर्य अक्षय्य राहो, हीच प्रार्थना. सगळ्यांना अक्षय्य तृतीयेच्या तसेच मुस्लिम बांधवांना ईदच्या मनापासून शुभेच्छा. असो..आज 3 तारीख, उद्यापासून गोंगाट बंद होईल. असा मजकूर ट्विटमध्ये होता.

अधिक वाचा  मान्यता नसलेल्या शाळांवर होणार कारवाई, पुणे विभागीय शिक्षण उपसंचालक यांचा इशारा

ट्रोलर्सनी प्राजक्ताला वाईट भाषेत ट्रोल केले आहे. एका ट्रोलरने तर या सुंदर बिनडोकपणामागचे रहस्य काय असे म्हटले आहे.