पुणे: रक्तदान ही महाराष्ट्राची परंपरा आहे. इतर अनेक राज्यात, दिल्लीत ही परंपरा नाही. रक्त देण्याने जीवनदान मिळते, याबाबत अजून जागरूकता घडवून आणली पाहिजे. समाजासाठी देण्याची भावना अशा शिबिरात असते. म्हणून मॉडर्न विकास मंडळाचा हा उपक्रम महत्वपूर्ण आहे असे मत माजी केंद्रीय मंत्री, खासदार प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते उद्घाटन झाले.

या शिबीराला प्रमुख पाहुणे म्हणून भारतीय जनता पक्षाचे पुणे शहर अध्यक्ष, जगदीश मुळीक , भाजपाचे शहर संघटन सरचिटणीस राजेश पांडे, माजी नगरसेवक जयंत भावे, दिलीप उंबरकर, प्रा. सदाशिव सोहोनी , अतुल कामटे हे उपस्थित होते.

अधिक वाचा  “परिस्थिती जेवढी बिकट मराठा तेवढाच तिखट”, सरसेनापती हंबीरराव’चा जबरदस्त टीझर रिलीज

मॉडर्न विकास मंडळ पुणे च्या वतीने आयोजित रक्तदान शिबिरात १६४ लोकांनी उत्साही प्रतिसाद देत महाराष्ट्र दिन साजरा केला. या शिबीराचे यंदाचे ३१ वे वर्ष होते. बढेकर ग्रुप, स्मार्ट पुणे फाऊंडेशन यांच्या सहकार्याने हे शिबिर पार पडले. डॉ. संदीप बुटाला, सौ. मनीषा बुटाला यांनी स्वागत केले. शिबीर सकाळी ९ ते दुपारी ३ या वेळेत,साकेत सोसायटी सभागृह, शिवतीर्थनगर कोथरूड येथे झाले.

 मॉडर्न विकास मंडळाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी संयोजन केले. प्रसिद्ध युवा बांधकाम व्यावसायिक प्रवीण बढेकर यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. संदीप गुजर यांनी प्रास्ताविक केले.