मुंबई : मनसे कार्यकर्त्यांनी मशिदींसमोर भोंगे लावून हनुमान चालिसा म्हणू नये म्हणून मुंबई पोलिसांनी सोमवारी मनसे कार्यकर्त्यांना नोटीस बजावली होती. मंगळवारी पुण्यात मनसे कार्यकर्त्यांना नोटिसा देणे सुरू केले होते. यानंतर राज ठाकरे यांनी हनुमान चालिसा म्हणाल असल्याचे पत्रक काढले होते. यामुळेच रात्री उशिरा राज ठाकरे यांना मुंबई पोलिसांनी १४९ अंतर्गत नोटीस बजावली आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना अखेर मुंबई पोलिसांनी नोटीस बजावली आहे. कलम १४९ अंतर्गत प्रतिबंधात्मक नोटीस बजावल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. शहरात बुधवारी पाहटेपासून तगडा पोलिस बंदोबस्त असणार आहे. मुंबईत कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलिस अलर्ट मोडवर आले आहे.

अधिक वाचा  भारतीय बॅडमिंटनपटूंचे ऐतिहासिक 'सुवर्ण'; पंतप्रधान मोदींकडून १ कोटींचं बक्षीस जाहीर!

भोंग्यांबाबत राज ठाकरे यांनी सरकारला दिलेल्या अल्टिमेटमचा कालावधी संपल्यानंतर मंगळवारी दोन पानी पत्रक काढले होते. यात अजान वाजल्यास मशिदींसमोर हनुमान चालिसा म्हणणार असल्याचे म्हटले होते. यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याचा प्रश्न आहे. यामुळे मुंबई पोलिसांनी राज ठाकरे यांना १४९ अंतर्गद नोटीस बजावली आहे.

मशिदींवरचे भोंगे ४ मेपर्यंत उतरवा, असे सरकारला आधीच सांगितले होते. परंतु, याबाबत सरकारची भूमिका बोटचेपेपणाची आहे. या देशातल्या राज्य सरकारांतता प्रत्येकजण सर्वोच्च न्यायालयाचे दाखले देत आहे. धर्माच्या नावाखाली वयोवृद्ध रुग्ण अशक्त व्यक्ती लहान मुले, विद्यार्थी यांना भोग्याच्या आवाजामुळे होणान्या त्रासाबाबत सर्वोच्च न्यायालयाचा जो निर्णय आहे. त्या निर्णयात सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट सांगितले आहे की ‘रात्री १० ते सकाळी ६ वाजेपर्यंत कुणालाही ध्वनिक्षेपक वापरता येणार नाही. प्रत्येक धर्मियांच्या सणांना तेवढ्याच दिवसांपुरती ध्वनिक्षेपक लावण्याची परवानगी मिळेल, परंतु, ३६५ दिवस परवानगी मिळणार नाही. ध्वनिक्षेपकासाठीची परवानगी ही रोज घ्यावी लागेल.’ असे असतानाही नियम पाळले जात नाही आहे.

अधिक वाचा  अभिनेता आर. माधवनने कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये केले पंतप्रधान मोदींचे कौतुक

यामुळे राज ठाकरे यांनी हनुमान चालिसा म्हणणार असल्याचे पत्रकात स्पष्ट केले होते. यामुळे मनसेचे कार्येकर्ते मशिदींमसोर हनुमान चालिसा म्हणतीय या विचाराने मुंबई पोलिस अलर्ट झाले आहे. याचाच एक भाग म्हणून राज ठाकरे यांना मुंबई पोलिसांनी १४९ अंतर्गत नोटीस बजावली आहे.