मुंबई : मशिदींवरील अनधिकृत भोंगे काढून टाकण्यात यावे अन्यथा आम्ही मशिदींसमोर हनुमान चालीसा वाजवू असा इशारा मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिल्यामुळे राज्यातील वातावरण ढवळून निघाले आहे. पण, यातून सुवर्णमध्य काढत काही मशिदींनी रितसरपणे परवानगी घेण्यासाठी पुढे आले आहे. मागील महिन्याभरात मुंबईत हजाराहून जास्त मशिदींनी भोग्यांसाठी परवानगी घेतली आहे.

राज ठाकरे यांनी भोंग्याचा मुद्या उपस्थितीत केल्यामुळे राज्यात सामाजिक आणि राजकीय वातवरण तापले आहे. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार भोंगे वाजवावे जर अनधिकृत भोंगे असतील तर ते काढून टाकावे अशी मागणी राज ठाकरे यांनी केली होती. उद्या 4 मे पर्यंत राज ठाकरे यांनी अल्टीमेटम दिला आहे. पण मुंबईतील हजारो मशिदींनी रितसर परवानगी घेण्यासाठी पुढे आल्या आहेत. मुंबई पोलीस आयुक्तांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या महिन्याभरात मुंबईत १,१४४ मशिदींनी अर्ज केले आहे. या मशिदींनी भोंग्या संदर्भात परवानगीसाठी अर्ज केले आहे. यापैकी ८०३ मशिदींना परवानगी देण्यात आली आहे.

अधिक वाचा  'पुष्पा 2'ची रिलीज डेट लीक! ‘या’ दिवशी चित्रपगृहांत घालणार धुमाकूळ

सर्व मशिदींनी सुप्रीम कोर्टाच्या नियंमांचे पालन करण्याचे आश्वासन दिले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करण्याच्या अटीवर ही परवानगी देण्यात आली आहे. तर दुसरीकडे, आता महाराष्ट्र पोलीस राज ठाकरेंच्या औरंगाबादमधील सभेवरूनर कारवाई करण्यासाठी सज्ज झाली आहे. अशातच राज्यात कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्यासाठी बाहेर व्यक्ती राज्यात धुडगूस घालण्याची शक्यता आहे, त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पोलिसांना महत्त्वाच्या सूचना दिल्या असून कारवाईचे आदेश दिल्याची माहिती समोर आली आहे.