मुंबई : कंगना रणौतनं नुकतीच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ  यांची भेट घेतली. उत्तर प्रदेशच्या वन डिस्ट्रिक वन प्राॅडक्टची  कंगना ब्रँड अँबेसिडर आहे. तिनं इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करत ही भेट अद्भुत होती, असं म्हटलंय.

एएनआयच्या रिपोर्टनुसार कंगना रणौतनं मुख्यमंत्री योगी यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली. कंगनानं या भेटीचे काही फोटो शेअर करत कॅप्शन लिहिली आहे, ‘निवडणुकीच प्रचंड मतांनी विजयी झालेल्या महाराजांना भेटण्याचं भाग्य मिळालं. ती संध्याकाळ खूपच अविस्मरणीय आणि अद्भुत होती. महाराजांची करुणा, लोकांप्रती काळजी आणि सखोल भावना मला नेहमीच चकित करून जाते. मी सन्मानीत होते. मला प्रेरणा मिळते.’

अधिक वाचा  एका जागेची काँग्रेस यादी वाढतच चाललीय! राज्यसभेत कोण जाणार

कंगना रणौतची साडी
सरकारनं सांगितलं होतं, उत्तर प्रदेशच्या जिल्ह्यांत चिकनकारी, जरीच्या साड्या, काळं मीठ यांचं उत्पन्न होतं. या वस्तू दुसरीकडे मिळत नाहीत. मुख्यमंत्री योगींच्या भेटीवेळी कंगनानं चिकनकारी साडी नेसली होती. कानात मोत्याचे इयररिंग्ज आणि गळ्यात माळ घातली होती.

कंगनाचे चित्रपट
कंगनाचा लवकरच धाकड हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. तसेच सध्या लॉक-अप या शोमधून कंगना प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या कार्यक्रमाचे कंगना सूत्रसंचालन करते.