मुंबई :- गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम  यांच्यावर नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. या चर्चेनंतर पहिल्यादांच रामदास कदम यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची भेट घेतली. यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

रामदास कदम हे शिवसेनेला राम राम ठोकत भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चा होत्या. मात्र कदम यांनी ते फेटाळले आहे. तसेच शिवसेनेचा भगवा झेंडा मरेपर्यंत माझ्या खांद्यावर असेल, अशी प्रतिक्रिया कदम यांनी दिली.

शिवसेनाप्रमुख आणि शिवसेनेचा मी कार्यकर्ता आहे. मी जिवंत असेपर्यंत भगव्याची साथ कदापि सोडणार नाही. मी या अगोदर सांगितले होते की, पक्षाशी बेइमानी करणार नाही. मी स्वत:ला असा डाग कधी लावून घेणार नाही, असे कदम म्हणाले.

अधिक वाचा  मनसेत मोठी गटबाजी उघड, मध्यवर्ती कार्यालयात राडा, कार्यकर्ते एकमेकांना भिडले

माझी कितीही बदनामी केली तरी शिवसेनेची साथ कधीच सोडणार नाही, असे कदम म्हणाले. खेडमधील जागर कदम वंशाच्या कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यासाठी आपण संजय राऊत यांची भेट घेतल्याचे ते म्हणाले.