लखनौ : गेल्या आठवड्यात भाजपच्या महिला नेत्या श्वेता सिंह गौर यांचा मृतदेह त्यांच्या राहत्या घरात आढळून आला. आता या प्रकरणाला नवीन वळण लागले आहे. पतीचे आंतरराष्ट्रीय सेक्स रॅकेटसोबत संबंध होते आणि ते लपविण्यासाठी पत्नीची हत्या केल्याचा आरोप श्वेता यांच्या कुटुंबीयांनी केला आहे.

भाजप नेत्या श्वेता सिंह गौर यांना आपल्या पतीवर संशय होता. त्यामुळे तिने पतीविरोधात पुरावे गोळा करण्यास सुरुवात केली होती. तिने तिच्या पतीचे फोनकॉल रेक़़ॉर्ड करण्यास सुरुवात केली होती. तिच्या कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, श्वेता सिंग गौरने तिच्या पतीच्या रशियन, मोरोक्कन आणि आफ्रिकन मुलींसाठी दलालांसोबत केलेल्या व्यवहाराचे पुरावे गोळा केले आहेत. त्याचे ऑडिओ रेकॉर्डींग देखील आहे. त्यावरून तो आंतरराष्ट्रीय सेक्स रॅकेटसोबत जुळला असल्याचे दिसून येते. हेच संबंध लपविण्यासाठी त्यांनी श्वेता यांची हत्या केली, असा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. पती दीपक सिंग गौर, त्यांची आई, वडील, मोठा भाऊ यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पतीला अटक करण्यात आली आहे.

अधिक वाचा  एका जागेची काँग्रेस यादी वाढतच चाललीय! राज्यसभेत कोण जाणार

श्वेता सिंह गौरने मृत्यूपूर्वी हे ऑडिओ रेकॉर्डिंग तिच्या कुटुंबियांसोबत शेअर केले होते. त्यापैकी एका ऑडिओ क्लिपमध्ये दीपक सिंग गौर रशियन मुलींचा पुरवठा करणाऱ्या दलाला सांगतो, की ”मी बांदा येथून आलो आहे. मला तुझा नंबर सुनील सिंह गौतमने दिला होता. व्यवस्था करावी लागेल. तू मला हॉटेलवर पाठवशील का? की मला यावे लागेल? तुझ्याकडे रशियन किंवा आफ्रिकलन मुली आहेत का? मला मुलींचे फोटो आणि त्यांचे दर पाठव.”

दुसर्‍या ऑडिओ क्लिपमध्ये, दीपक म्हणतो की, तो रोख पैसे देईल, परंतु दलाल त्याला ऑनलाइन पैसे देण्यास सांगतो. दुसर्‍या संभाषणात, दीपक दलालाला एक रशियन आणि एक भारतीय अशा दोन मुली 20,000 रुपयांना पाठवण्यास सांगतो. शेवटी त्यांनी एका रशियन आणि एका मोरोक्कन मुलीसाठी २३,००० रुपयांमध्ये करार केल्याचे ऑडिओ क्लिपमध्ये दिसतेय.

अधिक वाचा  पेट्रोल-डिझेलवरील व्हॅट कपात म्हणजे 'उंटाच्या तोंडात जिरे'; फडणवीसांची टीका

तिसर्‍या ऑडिओ रेकॉर्डिंगमध्ये दीपक रशियन मुलीसाठी विचारतो. पण दलाल त्याच्याकडे मोरोक्कन मुलगी असल्याचे सांगतो. दीपक त्याला कळवतो की चार लोकांचा एक गट आहे आणि त्यांना एका भारतीय मुलीचीही गरज आहे. यावर दोघे बराच वेळ बोलणी करतात.

पोलिस तपास सुरू –

दीपक सिंग गौर याला गेल्या शुक्रवारी अटक करण्यात आली, तर या प्रकरणातील इतर आरोपी फरार आहेत. त्यांना या प्रकरणाशी संबंधित अनेक व्हिडिओ मिळाले आहेत, त्या सर्वांचा तपास सुरू आहे. पोलिस आणखी पुरावे गोळा करत आहेत आणि सर्व संबंधितांवर योग्य ती कारवाई करतील, असं पोलिस अधीक्षक अभिनंदन म्हणाले.

अधिक वाचा  विधान परिषद 10 जागांचा निवडणुक कार्यक्रम जाहीर; कुणाला मिळणार संधी?