नवी दिल्ली – गेल्या काही दिवसांपासून प्रशांत किशोर हे नाव खूप चर्चेत आहे. त्याचे कारणही तसेच प्रशांत किशोर कॉंग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा होती मात्र तसे काही झाले नाही. दरम्यान निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी 2024 च्या लोकसभा निवडणुकीबाबत एक मोठे विधान केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हरवण्यासाठी कोणतीही तिसरी-चौथी आघाडी जिंकू शकत नाही असे मोठे विधान त्यांनी केले आहे.

2024 च्या लोकसभा निवडणुकीबाबत प्रशांत किशोर म्हणाले, 2024 च्या निवडणुकीत कोणतीही तिसरी किंवा चौथी आघाडी भाजपला पराभूत करू शकत नाही. जर भाजपला हरवायचे असेल तर दुसरी आघाडीच असा करिष्मा करू शकते. त्यामुळे भाजपला पराभूत करण्यासाठी आणखी एक मजबूत आघाडीच उभी राहणे आवश्यक आहे. म्हणजेच, राजकीय आणि संघटनात्मकदृष्ट्या भाजपइतकाच तुल्यबळ स्पर्धक भाजपला हरवू शकतो. असे मत त्यांनी एक वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत मांडले आहे.

अधिक वाचा  पुण्यात दिवसाढवळ्या सराफा व्यापाऱ्यावर सशस्त्र हल्ला

दरम्यान, प्रशांत किशोर हे निवडणूकांची रणनीती ठरविण्यासाठी माहेर आहेत. याआधी भाजपला म्हणजेच नरेंद्र मोदी यांना निवडणूक रणनीती आखून देण्यात प्रशांत किशोर यांच्या रणनीतींचा फायदा झाल्याचे अनेक वेळा दिसून आले आहे. निवडणूक रणनीती ठरवणारे प्रशांत किशोर राजकारणात प्रवेश करणार का? हा प्रश्न अनेकांना याआधी पडला होता. अलिकडे ते कॉंग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचाही चर्चा होत्या मात्र तसे काही झाले नाही. असे जरी असले तरी प्रशांत किशोर यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली होती यावरून ते राजकारणात येणार असे दिसून येत आहे.