पुणे: भारत देशात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या अप्रतिम संविधान असताना एक मजबूत लोकशाही असलेल्या देशातील कायदा व सुव्यवस्थेत नंबर एक वर असलेल्या महाराष्ट्रातील औरंगाबाद शहरात 1 मे रोजी राजकीय स्वार्थाने पछाडलेल्या एका पक्षाचा प्रमुख एक मोठ्या जनसमुदायासमोर विष ओकताना त्याच्या परिणामांची आजिबात विचार न करता सामाजिक विषयावर बोलत असल्याचा आव आणून, केवळ देशातील सर्व मशिदीवरील भोंगेच ध्वनिप्रदूषणास व त्रास होण्यास कारणीभूत असल्याचे सांगून असे भोंगे काढण्या करिता मनगटातील ताकतीचा उपयोग करण्याचे आव्हान केवळ हिंदू समाजाला करतात व तसेच सरळ मार्गाने होत नसेल तर “एकदा होऊन जाऊ दे” अशी चेतावणी देत महाराष्ट्रातील कायदा सुव्यस्थेचा विचार न करता हिंदू-मुस्लिम समाजास समोरा-समोर उभे करू पाहत आहेत.
महाराष्ट्र राज्यामध्ये समांतर सत्ताकेंद्र स्थापित करून महाराष्ट्रातील मुस्लीम समाजास वेठीस धरून धमकवणाऱ्या राज ठाकरेंवर कोणते कारवाई न करता ईदच्या दोन दिवस आगोदर २० पेक्षा अधिक संघटना व पक्षांनी विरोध करूनही
औरंगाबाद येथे राज ठाकरे यांना समाजात जातीय तेढ निर्माण करण्यास सभेस परवानगी देऊन त्याच्या जातीय राजकारणास राज्यातील ग्रह खाते हातात असलेल्या राष्टवादीने मूक संमती दिली असल्याचे समजते. रोज उठून स्वतःच्या स्वार्थी राजकारणासाठी मुस्लिम समाजास निशाणा बनवण्याची राजकीय संस्कृती बनली आहे. समाजाच्या मूलभूत प्रश्नावर न बोलता इफ्तार पार्टी देऊन मुस्लिम समाजाचे कैवारी असल्याचे नाटक आता तरी तथाकथित राजकीय पक्षांनी बंद करावे .
राज ठाकरे यांच्या मताशी सहमत नसलेले हिंदूसह सर्व समाजातील असंख्य नागरिक हे, सरकार मा. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करतो की राज यांच्या हुकुमाची तामीर करतो त्याच्याकडे पूर्ण लक्ष ठेवून आहे.राज ठाकरे यांच्या वर कायदेशीर गुन्हा नोंद करून कारवाई न केल्यास SDPI राज्यभर तीव्र आंदोलन करण्याचा अजहर तांबोळी यांनी दिला आहे.