”सहजच मनातलं शब्दात” हे पुस्तकं शीर्षक वरवरचे वाटत असले तरी यामध्ये वास्तवाचा पाया एवढ्या सूक्ष्म पद्धतीने घेतला आहे कि त्यामध्ये लेखिकीच्या मनाची ताकद लक्षात येते. संध्या बेडेकर यांनी केलेले २१ देशांचे देशाटन करुन आलेल्या ज्ञानाची प्रचिती लेखातून व्यक्त केली आहे असे मत डॉ. माधवी वैद्य यांनी मांडले. सौ. संध्या प्रकाश बेडेकर लिखीत ‘सहजच मनातलं शब्दात’ पुस्तक प्रकाशन डॉ. माधवी वैद्य ज्येष्ठ सहित्यिका यांच्या शुभहस्ते श्रीमती गंगाबाई धुमाळ बालोद्यान व विरंगुळा केंद्र, ईशानगरी शेजारी, वारजे, पुणे येथे करण्यात आले. मराठी भाषा संवर्धन समिती व साहित्यिक कट्टा वारजे ” आयोजन केले होते. यावेळी व्यासपीठावर प्रदिप उर्फ बाबा धुमाळ, प्रा. वि. दा. पिंगळे, संध्या प्रकाश बेडेकर उपस्थित होते.

अधिक वाचा  अखेर राज गर्जना होणार, २१ मे रोजी पुण्यात जाहीर सभा

कोणत्याही गोष्टीकडे सकारात्मक पाहिले तर त्यामधून आपणाला जगण्याची नवी दिशा मिळत असल्याची प्रचिती या पुस्तकातून मिळत असते. सहजच मनातल्या शब्दात याची मांडणी अत्यंत सुबक आणि आकर्षक पद्धतीने केल्याने संध्या बेडेकर यांची सौंदर्यदृष्टी यातून व्यक्त होते. या कलाकृतीत सौंदर्यातून मूल्य मांडले असून त्याचा वाचकांना नक्कीच फायदा होईल असे यावेळी बोलताना ज्येष्ठ साहित्यिका डॉक्टर माधवी वैद्य यांनी यावेळी सांगितले.

यावेळी प्रा. वि. दा. पिंगळे कार्यवाह, म.सा.प. यांनी पुस्तकाचे विषालाषण करताना या पुस्तकात नैराश्य कमी करण्याची ताकद असल्याचे सांगितले.संध्या प्रकाश बेडेकर यांचे पाहिले लेखन हे इतकं दर्जात्मक आहे की त्यामध्ये सामाजिक जीवनाच्या सखोल व सूक्ष्म निरीक्षणे नोंदवली आहेत. ‘आई म्हणजे भेटीला आलेला देव अन् पत्नी ही देवाने दिलेली भेट’ अश्या बोलक्या शब्दात सामाजिक विषय हाताळले आहेत असेही सांगीतले.

अधिक वाचा  राष्ट्रवादीतही प्रभाग रचनेची धुसफूस; 'खडकवासला' त विरोधकांसाठी बदल

बाबा धुमाळ व दीपाली धुमाळ यांनी वारज्यातील जगण्याची लढाई जिंकत मनाची भूक भागवली असे गौवोद्गारही डॉ. माधवी वैद्य यांनी काढले. कार्यक्रमाचे संयोजक गोपाळ कुलकर्णी, संगिता कुलकर्णी, महेश कुलकर्णी, शरद जतकर, साधना कुलकर्णी, उदय कुलकर्णी, निवृत्ती येनपुरे, वि. दा. पिंगळे, जयंत मोहिते, सुरेश जाधव, अशोक शहा यांनी केले होते.

निमंत्रक श्री प्रदिप उर्फ बाबा धुमाळ मा. नगरसेवक, मा. अध्यक्ष शिक्षण मंडळ पुणे म.न.पा व सौ. दिपाली प्रदिप धुमाळ मा. विरोधी पक्षनेत्या / नगरसेविका, पुणे म.न.पा. व डी. के. जोशी यांनी योग्य नियोजन केले होते.