“२०२३ नंतर देवेंद्र फडणवीस यांची सत्तेच्या जवळ जाण्याची शक्यता निर्माण होईल. या काळात देवेंद्र फडणवीस यांचा प्रभाव वाढणार आहे”,आगामी काळात राज ठाकरेंचा प्रभाव वाढणार आहे. लोकांमध्ये त्यांची प्रतिमा वाढेल. राज ठाकरे यांच्यासाठी कुंभ राशीमधील शनी फायदेशीर ठरणार आहे, अशी भविष्यवाणी ज्योतिष अभ्यासक डॉ. नरेंद्र धारणे यांनी केली आहे. ज्योतिष अभ्यासक डॉ. नरेंद्र धारणे यांच्या भविष्यवाणीची सध्या राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे. डॉ. नरेंद्र धारणे हे ज्योतिष अभ्यासक आहेत. यावेळी ज्योतिष अभ्यासक डॉ. नरेंद्र धारणे यांनी महाराष्ट्रातील प्रमुख नेत्यांच्या बाबतीत देखील भविष्यवाणी केली आहे.

अधिक वाचा  नवाब मलिकांप्रमाणे उद्धव ठाकरेंचेही D गँगशी संंबंध का? - सोमय्या

“महाराष्ट्रातील प्रमुख नेते उद्धव ठाकरे यांची रास सिंह आहे. तर शरद पवार यांची रास कन्या आहे. उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे”, अशी भविष्यवाणी ज्योतिष अभ्यासक डॉ. नरेंद्र धारणे यांनी केली आहे. यावेळी ज्योतिष अभ्यासक डॉ. नरेंद्र धारणे यांनी सरकारला देखील काही सल्ले दिले आहेत.

“निर्णय प्रलंबित ठेवल्यामुळे लोकांमध्ये असंतोष वाढेल. निर्णय प्रक्रिया लांबत असल्याने सरकारला लोकांच्या रोषाचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे सरकारने लोकहिताचे निर्णय घ्यावेत”, असा सल्ला ज्योतिष अभ्यासक डॉ. नरेंद्र धारणे यांनी दिला आहे. ८४ दिवसांमध्ये शेअर बाजार उच्चांक पातळी गाठेल, असा अंदाज ज्योतिष अभ्यासक डॉ. नरेंद्र धारणे यांनी व्यक्त केला आहे.

अधिक वाचा  "काँग्रेसची अवस्था आभाळ फाटल्यासारखी, ठिगळं तरी कुठे लावणार?", शिवसेनेलाही लागली चिंता

यावेळी डॉ. नरेंद्र धारणे यांनी भारतामधील महागाईबाबत देखील अंदाज व्यक्त केला आहे. शनी, कुंभ, मकर आणि तूळ या राशींसाठी हा काळ उत्तम आहे. या काळात भारताची आर्थिक स्थिती सुधारेल. तसेच या काळात महागाई देखील कमी होण्याची शक्यता आहे. उद्योगधंद्यांच्या बाबतीत सकरात्मक घटना घडतील, असा अंदाज ज्योतिष अभ्यासक डॉ. नरेंद्र धारणे यांनी व्यक्त केला आहे.

“२९ वर्षांनंतर शनी कुंभ राशीमध्ये प्रवेश करणार आहे. २२ जुलै २०२२ पर्यंत शनी भ्रमण होणार आहे. भारत मकर राशीत येतो. त्यामुळे या काळात भारत जागतिक स्तरावर आर्थिक प्रबळ दावेदार बनेल, अशी भविष्यवाणी ज्योतिष अभ्यासक डॉ. नरेंद्र धारणे यांनी केली आहे. कोरोना महामारीचा १३ जुलैपर्यंत भारतावर कोणताही परिणाम जाणवणार नाही, असे देखील डॉ. नरेंद्र धारणे यांनी सांगितले आहे.आता ही भविष्यवाणी खरी ठरेल की नाही, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.