मुंबई : राज्यातील विरोधक हिंदुत्वाच्या मुद्द्यामुळे वारंवार शिवसेनेला खिंडीत गाठत असल्याचे चित्र असून हा मुद्दा किती कळीचा आहे याचा आता प्रत्यय येत आहे. काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेना प्रवक्त्यांची बैठक बोलावली होती. त्यामध्ये त्यांनी आता शिवसैनिकांनी आक्रमक भूमिका घेण्याविषयी सूचना दिल्या आहेत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मनसे आणि भाजपवर तुटून पडा असा आदेश दिला आहे. राज ठाकरे तसेच भाजपकडून सातत्याने होणाऱ्या टीकेला आता जशास तसे उत्तर देण्याची भूमिका उद्धव ठाकरे यांनी घेतल्याचं समजतंय. त्याचाच एक भाग म्हणून शिवसेनेच्या प्रवक्त्यांना भाजप आणि मनसेवर तुटून पडण्याचा आदेश देण्यात आला आहे.

अधिक वाचा  “महिन्याभर पक्षात हुकुमशाही सुरू आहे”, सभेआधी वसंत मोरेंचा दावा!

दरम्यान, बाबरी मशिद पाडली तेव्हा राज ठाकरे कुठे होते? मंदिरासाठी यात्रा सुरु होती तेव्हा राज ठाकरेचं काय सुरु होतं? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी बैठकीत उपस्थित केला. यादरम्यान त्यांनी भाजपकडून करण्यात आलेल्या विविध आरोप आणि टीकेवरुनही सेना प्रवक्त्यांना सूचना दिल्या. आरोप करणाऱ्या भाजपच्या प्रवक्तांवर तुटून पडा. सगळ्यांना सडेतोड उत्तर द्या. यांचं हिंदुत्व कसं बोगस आहे हे सगळ्यांना दाखवा. आपली कामं लोकापर्यंत पोहचवा, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या.