पुणे- देशभरात सध्या मान्सूनपूर्व नैसर्गिक हालचाली सरासरी 43 ते 45 टक्‍क्‍यांनी घटल्याने हवामान संशोधकांनी म्हटले आहे. यात विशेषत: वारा, वादळ आणि पाऊस या घटना गृहित धरल्या जातात.पण, यंदा या घटनांचे प्रमाण घटले आहे. तर, दुसऱ्या बाजूला उष्णतेच्या प्रकोप वाढला आहे. ही स्थिती पाहता यंदा देशभरात मान्सून म्हणजेच मोसमी पावसाला पूरक वातावरण असल्याचा दावा हवामान अभ्यासक करत आहेत.

हवामान अभ्यासकांच्या मते, “ज्या भागात मान्सूनपूर्व हालचाली कमी असतात तेथे मान्सून चांगला राहण्याचा अंदाज आहे याचा कोणताही शास्त्रीय संबंध जोडता येणार नाही. पण, संशोधकांच्या अभ्यासाचा तो एक अंदाज आणि निष्कर्ष आहे.

अधिक वाचा  उद्धव ठाकरेंच्या व्यावसायिक पार्टनरचे कसाबशी संबंध ,सोमय्यांचा आरोप

देशभरात उन्हाळी हंगामात सुमारे 43 टक्‍के कमी पाऊस नोंदवला गेला आहे. तर, उत्तर भारत आणि पश्‍चिम भारतात हे प्रमाण तब्बल 91 टक्‍के राहिले आहे. मध्य भारतात हे प्रमाण सरासरी 81 टक्‍के राहिले आहे. त्यामुळे उष्णतेचे प्रमाण वाढले आहे.