हडपसर –महापालिका कार्यक्षेत्रात जाहिरात फलक किंवा फ्लेक्‍स किंवा होर्डिंग्ज लावताना आकाशचिन्ह विभागाची परवानगी आवश्‍यक असते. यासाठी ठरावीक शुल्क भरावे लागते. मात्र, हडपसर येथील मुख्य रस्त्यांच्या पथदिव्यांचा वापर सध्या फुकटची जाहिरातबाजी करण्यासाठी होत आहे. याकडे पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष आहे.

हडपसर-मुंढवा क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत असलेल्या भागात अशा प्रकाराच्या सर्वाधिक अनधिकृत जाहिरातींचे फ्लेक्‍स लटकत आहेत. रामटेकडी उड्डाणपूल, मगरपट्टा चौक, हडपसर गाव, हडपसर उड्डाणपूल, गाडीतळ, रविदर्शन, आकाशवाणी, पंधरानंबर, लक्ष्मी कॉलनी, शेवाळेवाडी फाटा, मांजरी फार्म या भागातील पथदिव्यांचा वापर जाहिरातीचे फ्लेक्‍स लावण्यासाठी होत आहे. बांधकाम व्यावसायिक, कोचिंग क्‍लासेस, हॉटेल, खासगी शाळा, पीजी, बंगले, फ्लॅट अशा अनेक “फुकट’च्या जाहिराती खांबावर झळकत आहेत. विशेष म्हणजे यावर जाहिरातदारांचे नाव, मोबाइल नंबर असूनही पालिकेचे अधिकारी कारवाई करीत नाहीत.

अधिक वाचा  पुण्यात राज ठाकरे यांची दीड तासात तब्बल 50 हजार रुपयांची पुस्तकं खरेदी