मुंबई: मशिदीवरील भांगे आणि हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यात रान पेटवलं आहे. मशिदीवरील भोंगे हटवण्यासाठी त्यांनी महाविकास आघाडी सरकारला 3 मे पर्यंतचा अल्टिमेटमही दिलाय. दुसरीकडे भाजपही राज ठाकरे यांच्या भूमिकांना जाहीर पाठिंबा देत असून, ठाकरे सरकारला घेरण्याची एकही संधी ते सोडत नाहीत. अशावेळी शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वर्षा बंगल्यावर शिवसनेचे नेते, खासदार आणि प्रवक्त्यांची महत्वाची बैठक घेतली. या बैठकीत शिवसंपर्क अभियान आणि सध्याच्या राजकीय घडामोडींवर चर्चा मशिद पाडली तेव्हा राज ठाकरे कुठे होते? असा सवालही त्यांनी केलाय. इतकंच नाही तर उद्धव ठाकरे यांनी भाजपवर तुटून पडण्याचे आदेश शिवसेनेच्या नेत्यांना दिलेत.

अधिक वाचा  शिखर धवनला त्याच्या वडिलांनी बदडले, प्लेऑफमध्ये न पोहोचल्याने नाराज

 मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर शिवसेना प्रवक्त्यांची बैठक घेतली. त्या बैठकीत बोलताना बाबरी मशिद पाटली तेव्हा राज ठाकरे कुठे होते? मंदिरासाठी यात्रा सुरु होती तेव्हा राज ठाकरेंच काय सुरु होतं? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केलाय. तसंच आरोप करणाच्या भाजपच्या प्रवक्त्यांवर तुटून पडा, सगळ्याना सडेतोड उत्तर द्या. त्यांचे हिंदुत्व कस बोगस आहे हे सगळ्यांना दाखवा. आपली काम लोकांपर्यंत पोहचवा, असे आदेशच उद्धव ठाकरे यांनी शिवसेना प्रवक्त्यांना दिले आहेत.

 बैठकीसाठी हे उपस्थित ?

1) संजय राऊत 2) अरविंद बी सावंत (3) नीलम गोऱ्हे

अधिक वाचा  दख्खनच्या राजाला 1 टनाची महाघंटा अर्पण, जोतिबाच्या भक्तासाठी अनोखा अनुभव

4) प्रियंका चतुर्वेदी 5) सचिन आहेर 6) सुनील प्रभू

7) किशोरीताई पेडणेकर 8) शीतल म्हात्रे 9) शुभा राऊळ

10) किशोर कान्हेरे 11) संजना घाडी 12) आनंदराव दुबे

(13) किशोर तिवारी 14) हर्षल प्रधान 15) विनायक राऊत

16)ओमराजे निंबाळकर 17) अनिल देसाई 18) हेमंत पाटील

19) श्रीरंग बारणे (20) धर्मसिल माने 21) संजय मंडलिक

22) भावना गवळी (23) श्रीकांत शिंदे

शरद पवार, उद्धव ठाकरेंमध्ये दीड तास खलबतं

शिवसेना नेत्यांच्या बैठकीपूर्वी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची वर्षा निवासस्थानी जाऊन भेट घेतली. या दोन्ही नेत्यांमध्ये तब्बल दीड तास चर्चा झाली. या भेटीतील चर्चेचा नेमका तपशील समजू शकला नाही. मात्र, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची औरंगाबादची सभा, भोग्यांचा मुद्दा, राज्यातील कायदा सुव्यवस्था आणि नवनीत राणा यांना झालेली अटक आदी मुद्द्यावर या भेटीत चर्चा झाल्याचं कळत. पवार यांनी अचानक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची चर्चा केल्याने त्यावर आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. या चर्चेवेळी केवळ शरद पवार आणि उद्धव ठाकरे हे दोनच नेते उपस्थित असल्याचं सांगितलं जातं. राज्यातील विकास प्रकल्पावरही या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती आहे.