कन्नड सुपरस्टार यशचा चित्रपट ‘KGF Chapter 2’ बॉक्स ऑफिसवर सध्या धुमाकूळ घालत आहे. लोकांच्या मनावर या चित्रपटाचा इतका प्रभाव आहे की, दुसऱ्या आठवड्यातही या चित्रपटाने बक्कळ कमाई केली आहे. अलीकडेच साऊथचा सुपरस्टार यशने त्याच्या ‘KGF Chapter 2’ या चित्रपटाच्या यशाबद्दलचे रहस्य सांगितले आहे.

एका मुलाखतीत यशने त्याच्या आगामी ‘केजीएफ चॅप्टर 3’ या चित्रपटाबद्दलही मोकळेपणाने सांगितले आहे. या चित्रपटाचा तिसरा भाग ‘KGF 1’ आणि ‘KGF 2’ पेक्षा अधिक धमाकेदार असेल, असे साऊथ सुपरस्टार यशने सांगितले आहे. सध्या अभिनेता यशची लोकप्रियता वेगळ्याच उंचीवर पोहचली आहे. ‘KGF’ चित्रपटामुळे त्याचे चाहते देखील वाढले आहेत.

अधिक वाचा  ‘मेट्रोमॅन’ हरपला!: शशिकांत लिमये काळाच्या पडद्याआड; हृदयविकाराच्या झटक्याने झालं निधन

मुलाखतीत अभिनेता यशने सांगितले की, रॉकीच्या आयुष्यात अजून खूप काही सांगण्यासारखं आहे, जे तिसऱ्या भागात दाखवलं जाणार आहे. मी आणि चित्रपटाचे दिग्दर्शक प्रशांत नील यांनी तिसर्‍या भागासाठी खूप विचार केला आहे. अशा अनेक गोष्टी आहेत ज्या आम्ही ‘KGF 2′ मध्ये दाखवू शकलो नाही. त्या आम्ही KGF 3’ मध्ये तयार दाखवणार आहोत”, असे अभिनेता यशने सांगितले आहे.

अभिनेता यशने पुढे सांगितले की, “प्रशांत नीलने या चित्रपटाची कथा फक्त एकाच भागात सांगण्याचा विचार केला होता. पण निर्मितीच्या मध्यभागी प्रशांतने त्याचे दोन भाग करायचे ठरवले आहे. प्रॉडक्शनदरम्यानच प्रशांतच्या लक्षात आले की एक भाग बनवण्यासाठी आपण घाईघाईने अनेक दृश्यांचे संकलन करत आहोत. त्यामुळे चित्रपटाचा भावनिक कोन कमकुवत होत होता. म्हणून ते भागांमध्ये विभागले गेले आहे.”

अधिक वाचा  जपानची संशोधनासाठी शुभमला ‘मेक्स्ट’ शिष्यवृत्ती;

‘KGF Chapter 2’ या चित्रपटाने तिकीटबारीवर बक्कळ कमाई केली आहे. या चित्रपटाने आंतरराष्ट्रीय स्तरावर ९०० कोटी रुपयांची कमाई केली आहे. काही दिवसांत हा चित्रपट १००० कोटींचा टप्पा ओलांडेल, असे मत चित्रपट व्यापार तज्ञांनी व्यक्त केलं आहे. आतापर्यंत दंगल या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर सर्वात जास्त कमाई केली आहे.

या चित्रपटाने आंतरराष्ट्रीय स्तरावर २०२४ कोटी रुपयांची कमाई केली आहे. त्यानंतर बाहुबली-द कन्क्लुजन या चित्रपटाने १८१० कोटी रुपये कमावले आहेत. काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या RRR या चित्रपटाने ११०० कोटी रुपयांची कमाई केली आहे. ‘KGF Chapter 2’ या चित्रपटाने १००० कोटी कमवल्यास हा चौथा सर्वात जास्त कमाई करणारा चित्रपट ठरणार आहे.